Video : ‘अशा’ नकला तर माणसंही करू शकणार नाहीत! पाहा, प्राण्यांचे मजेदार क्षण… एका क्लिकवर…

Animals funny videos : कॉपी करण्यात कुत्रे आणि मांजरी देखील कमी नाहीत. या नकला (Copy) करणाऱ्या प्राण्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

Video : 'अशा' नकला तर माणसंही करू शकणार नाहीत! पाहा, प्राण्यांचे मजेदार क्षण... एका क्लिकवर...
माणसांची नक्कल करणारे पाळीव प्राणीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:46 PM

Animals funny videos : या जगात विविध प्रकारचे प्राणी राहतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक, काही अतिशय शांत तर काही अतिशय खोडकर आहेत. यामध्ये माकडांचे नाव प्रथम येते. खोडसाळपणाच्या बाबतीत त्यांचा काही मेळ नाही. माकडे इतकी खोडकर असतात की लोकांच्या हातून काहीही हिसकावून पळून जातात. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये माकड लोकांचे सामान हिसकावून पळून जातात, तर काही माकडे तर खोडकरपणे लोकांना मारतात. माकडे अनुकरण करणारे प्राणी असतात. ते पटकन् कोणाचीही कॉपी करतात. अशीच कॉपी करण्यात कुत्रे आणि मांजरी देखील कमी नाहीत. या नकला (Copy) करणाऱ्या प्राण्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

कॉपी करणारे प्राणी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक महिला तिचे दोन्ही पाय भिंतीवर उंचावून व्यायाम करत आहे आणि तिच्या शेजारी तिचा पाळीव कुत्राही नक्कल करण्यात गुंग झाला आहे. दोन्ही पाय वर करून तो व्यायामाला सुरुवात करत आहे. यानंतर पुढच्या सीनमध्ये काही महिला पाठीवर झोपून सायकल चालवण्याच्या स्टाईलमध्ये व्यायाम करताना दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक कुत्राही तसाच प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे, व्हिडिओच्या पुढील दृश्यात, एक मांजर देखील महिलेची नक्कल करताना दिसत आहे, तर दुसरी मांजर भिंतीवर असलेल्या मांजरीसारख्या घड्याळाकडे पाहून शेपूट हलवत आहे. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये एक पोपटही नक्कल करताना दिसतो.

ट्विटर हँडलवर शेअर

हा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ आहे, जो आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बंदर तो यूंही बदनाम हैं. इन नकलचियों का कोई मेल नहीं’. अवघ्या 1 मिनिटाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक करून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

आणखी वाचा :

Horse swimming : घोड्याला कधी पोहताना पाहिलंय का? नसेल तर ‘हा’ Video तुमच्यासाठी आहे…

Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.