Video: उंदराला पाहून मांजर घाबरली, क्षणांत धूम ठोकली, पाहा इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडीओ

मांजरीला बघितल्यावर उंदीर काही सेकंदातच आपला मार्ग बदलतो, परंतु समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर फक्त मांजरीकडे पाहतो, मांजरीला ओळखच देत नाही

Video: उंदराला पाहून मांजर घाबरली, क्षणांत धूम ठोकली, पाहा इंटरनेटवर व्हायरल होणारा व्हिडीओ
मांजरासमोर उंदिर बिनधास्त निघून जातो
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 5:04 PM

सोशल मीडियावर लोकांना मांजरी आणि मांजरींशी संबंधित मजेदार व्हिडिओ खूप आवडतात. हे व्हिडिओ पाहून अनेक वेळा आपण हसू आवरु शकत नाही, तर अनेक वेळा हे व्हिडिओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या असा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. (Funny viral video of cat people will shocked after watching this)

आपल्या सर्वांना माहित आहे की, मांजरीचा सर्वात आवडता शिकार हा उंदीर आहे, मांजरीला बघितल्यावर उंदीर काही सेकंदातच आपला मार्ग बदलतो, परंतु समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर फक्त मांजरीकडे पाहतो, मांजरीला ओळखच देत नाही, पण मांजर मात्र त्याला पाहून पळ काढते. आता तुम्हीच पाहा असं का झालं असेल ते.

पाहा व्हिडीओ:

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की गादीच्या फाटलेल्या भागातून एक मोठा उंदीर बाहेर आला आहे. यानंतर तो मांजरीकडे पाहतो. मांजरीलाही तो दिसतो, पण मांजरीला काय होतं ते कळत नाही, ती उंदरावर हल्ला करण्याऐवजी तिथून पळून जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर @Jamie24272184 नावाच्या युजरने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहीपर्यंत हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटते, तर अनेकांना हा व्हिडीओ खूपच हास्यास्पद वाटतो. हेच कारण आहे की अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या. एका युजरने सांगितले की, इथं गंगा उलट्या वाहते आहे. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, उंदराने मांजरीला याच्या डोळ्यांची भीती दाखवली. या व्यतिरिक्त, इतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही पाहा:

Video: तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते, प्राण्यांना किती कळतं पाहा!

Video: प्रशिक्षकालाच माकडाचा जोरदार रपाटा, व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.