गदर-2 चित्रपटाचे रिव्ह्यू थेट पाकिस्तानातून! व्हिडीओ बघून खूप हसाल

एका व्यक्तीला तर वाटतं सनी देओल खरोखरच पाकिस्तानात पोहोचला आहे आणि पाकिस्तानींपासून सुटका करत आहे. "तो पाकिस्तानात का आला आणि परत कसा जाणार याचा विचार सरकारने करायला हवा. सरकारनेच त्याला पाकिस्तानात आणलं असावं आणि आणखी कोण आणणार?" असं ती व्यक्ती बोलते.

गदर-2 चित्रपटाचे रिव्ह्यू थेट पाकिस्तानातून! व्हिडीओ बघून खूप हसाल
Gadar 2 movie review from pakistanImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 10:59 AM

मुंबई: सनी देओलचा ‘गदर-2’ येताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झेंडा फडकवला. ‘गदर’ प्रमाणेच हा चित्रपटही लोकांना खूप आवडत असून जबरदस्त कमाईही करत आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्येच 130 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती आणि हा चित्रपट अजूनही तितकाच जोरात आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहून लोकांना छान वाटतंय. विशेषत: तारा सिंग म्हणजेच सनी देओलने पाकिस्तानात पुन्हा एकदा केलेला विध्वंस सगळ्यांच्या पसंतीस पडलाय.

या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही सुरू झाली आहे. पाकिस्तानी लोकांनी या चित्रपटाचा असा मजेशीर रिव्ह्यू दिला आहे की तुम्ही खूप हसाल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लोकांना ‘गदर-2’चा रिव्ह्यू विचारत आहे आणि लोक त्याच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरे देत आहेत. पाकिस्तानींमध्ये ‘तारा सिंग’ ची इतकी भीती आहे की ते ‘सनी देओलला मारायला हवे’ असे म्हणताना दिसतात. पण त्यांनतर “आता सांगा कुणाची हिंमत असेल सनी देओलला मारायची? तुझ्यात हिंमत आहे का?” असं संभाषण करताना दिसतात. यावर उत्तर देताना समोरचा म्हणतो, “माझ्याकडे शस्त्र असेल तर मी त्याच्याशी खंबीरपणे लढा देईन. सनी देओलला स्वत:च्या हाताने मार देईल असंही तो मुलगा म्हणतो.

एका व्यक्तीला तर वाटतं सनी देओल खरोखरच पाकिस्तानात पोहोचला आहे आणि पाकिस्तानींपासून सुटका करत आहे. “तो पाकिस्तानात का आला आणि परत कसा जाणार याचा विचार सरकारने करायला हवा. सरकारनेच त्याला पाकिस्तानात आणलं असावं आणि आणखी कोण आणणार?” असं ती व्यक्ती बोलते.

हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर @Bharatojha03 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, त्यानंतर सोशल मीडिया युजर्स ही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘पाकिस्तानी आपले हॅन्डपंप लपवत असतील’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘पाकिस्तानी तुम्ही तुमच्या पाकिस्तानचे सर्व नळ काढून घ्या, नाहीतर सनी देओल येईल’.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.