सोशल मीडियावर पुन्हा #ghostphotochallenge ट्रेंड, नेटकऱ्यांकडून भूतांच्या पेहरावातले फोटो पोस्ट
सध्या सोशल मीडियावर असंच चॅलेंज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याचे नाव आहे 'घोस्ट फोटो चॅलेंज'.
इंटरनेटच्या जगात रोज काही नाही काही ट्रेंड सुरु असतात. त्यात काही फनी चँलेंजेसही दिले जातात. ज्यात सेलिब्रेटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वच जण सहभागी होतात. सध्या सोशल मीडियावर असंच चॅलेंज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याचे नाव आहे ‘घोस्ट फोटो चॅलेंज’. लोक मोठ्या संख्येने भूताच्या पोशाखात रेकॉर्ड केलेले त्यांचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर टाकत आहेत, आणि त्याखाली #ghostphotochallenge आणि #ghostphotoshoot हॅशटॅगसह शेअर करत आहेत. सर्वात आधी हे घोस्ट फोटो चॅलेंज आहे तरी काय आहे ते जाणून घेऊया? ( ghost-photo-challenge-has-again-resurfaced-on-instagram-know-what-is-the-challenge )
हे काही नवीन चॅलेंज नाही, पहिल्यांदा 2020 मध्ये हेलोवीनच्या आसपास टिकटॉकवर हे चॅलेंज देण्यात आलं होतं. त्यानंतर जगभरातील कृष्णवर्णीयांना समान हक्कांच्या मागणीसाठी ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळ चालू होती. त्या वेळी टीकाकारांनी या ‘घोस्ट चॅलेंज’वर तीव्र नाराजी व्यक्त केली.
View this post on Instagram
तुमच्या माहितीसाठी, या चॅलेंजमध्ये सोशल मीडिया युजर्सना पांढऱ्या कपड्याने स्वतःला झाकून घ्यायचं असतं, त्यावर काळा गॉगल वा चष्मा घालावा लागतो. या चॅलेंजचं युजर्स फोटोशूट करण्यासाठी तुम्ही कोणतेही विचित्र ठिकाण निवडू शकता. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तुम्ही ही ठिकाणं पाहू शकता. सध्या हे चॅलेंज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेटिझन्स सक्रिय सहभाग घेत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भुतांच्या पोशाखातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर #ghostphotoshoot आणि #ghostphotochallenge हॅशटॅगसह फोटो पोस्ट केले जात आहेत. अनेक युजर्स आपण खरेखुरे भूत वाटण्यासाठी हवं ते करताना दिसत आहेत. कुणी पांढऱ्या कपड्यांवर काळे गॉगल घालतोय, कुणी सामसुम ठिकाणी विचित्र वेशभूषा करुन फोटो काढतोय तर कुणी त्याचे व्हिडीओ बनवत आहे.
हेही पाहा: