किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. अशावेळी समोर जर किंग कोब्रा (Kind Cobra) आला तर..? या विचारनंच घामही फुटतो. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये (Video) किंग कोब्रा चक्क एका घरात घुसल्याचं दिसून आलं आहे. एका घरातील किचनमध्ये असलेल्या टेबलाखाली जाऊन किंग कोब्रा लपला होता. अत्यंत डेंजर असलेल्या या किंग कोब्राची साईज तब्बल दहा फूट होती. त्यामुळे सगळ्यांचं या किंग कोब्राला आता बाहेर कसा काढायचा, असा प्रश्न पडला होता. अखेर घरातल्यांनी रेस्क्यू टीमला (Rescue Team) याबाबत कळवलं. यानंतर सुरु झालं किंग कोब्राला पकडण्याचं थरारनाट्य!
NowThis नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नाऊधिसने केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडीओ थायलंडमधील असल्याचं समोर आलंय. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिन या किंग कोब्राचं रेस्क्यू केलंय. सर्पमित्रांनीच या संपूर्ण रेस्क्यूचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं असून हा थराराक घटनाक्रमही त्यांनी शेअर केलाय.
थायलंडमधील एका घरात किंग कोब्रा शिरला. त्यानंतर याबाबतची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. किंग कोब्रा मोठा असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी अख्खी टीम घरात दाखल झाली होती. हा किंग कोब्रा चक्क टेबलाखाली जाऊन लपला होता. त्याला सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं बाहेर काढलं. यानंतर त्याला घरबाहेर काढत सर्पमित्रांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण किंग कोब्राला पकडणं इतकं सोप्पं नव्हतं. किंग कोब्रा फणा काढून बसला होता. यानंतर सर्पमित्रांनी आपलं कौशल्य पणाला लावत त्यांना धरलं. मग एका किंग कोब्रासाठी आणलेला कंटेनर उघडला. दुसऱ्यानं शेपूट पकडून त्याला सुरक्षित अंतरावरुन पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडलाय. ही घटना 15 जानेवारीची असल्याचा दावा न्यूजप्लेअरनं केला आहे.
Watch as snake catchers try to coax a 10-ft-long king cobra out of a family’s kitchen in Thailand. The family was inside the house when the giant snake entered, causing them to flea the premises & alert animal officials. Specialists were able to safely corral the cobra. pic.twitter.com/qqEQ8nAMDN
— NowThis (@nowthisnews) January 19, 2022
दरम्यान, ज्यावेळी का किंग कोब्रा घरात शिरला, तेव्हा कुटुंबातील सगळे सदस्य घरातच होते. थायलंडमध्ये साप घरात येणं, याला एक वेगळं महत्त्व आहे. थायलंडमधील लोक साप घरात येणं हे चांगलं लक्षण असं मानतात.
Viral Video : आजोबांचा बूस्टर डोस..! मारला असा काही जबरदस्त शॉट, यूझर्स म्हणाले…
Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा ‘असा’ही फॅन…. अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन