जगात पहिल्यांदा जन्माला आला असा अनोखा जिराफ! फोटो बघून सगळेच आश्चर्यचकित
अनेक मुले दोन डोके घेऊन जन्माला येतात, तर अनेक मुले दोन शरीरे आणि एक डोके घेऊन जन्माला येतात. इतकंच नाही तर अनेकदा जनावरांसारखी दिसणारी मुलं जन्माला आल्याच्या बातम्या येत असतात. अनेक फूट लांब मानेमुळे अधिक प्रसिद्ध असलेले जिराफ तुम्ही पाहिले असतील. जिराफांच्या संपूर्ण शरीरावर पट्टे असतात.
मुंबई: जगात काय घडेल याबद्दल कुणीच काही सांगू शकत. आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल की अनेकदा असे होते की अनोखी मुले जन्माला येतात, जी सामान्य मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. अनेक मुले दोन डोके घेऊन जन्माला येतात, तर अनेक मुले दोन शरीरे आणि एक डोके घेऊन जन्माला येतात. इतकंच नाही तर अनेकदा जनावरांसारखी दिसणारी मुलं जन्माला आल्याच्या बातम्या येत असतात. अनेक फूट लांब मानेमुळे अधिक प्रसिद्ध असलेले जिराफ तुम्ही पाहिले असतील. जिराफांच्या संपूर्ण शरीरावर पट्टे असतात. पण हा अमेरिकेत जन्माला आलेला जिराफ बघा, हा किती अनोखा आहे ना? अहो या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत.
पट्टे नसणाऱ्या जिराफाचा जन्म
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, टेनेसीतील एका खासगी प्राणिसंग्रहालयात या पट्टे नसणाऱ्या आणि तपकिरी रंगाच्या जिराफाचा जन्म झाला. विशेष म्हणजे हा अनोखा जिराफ जन्माला घालणारी मादी जिराफ सामान्य जिराफसारखीच आहे. म्हणजेच तिच्या शरीरावर पट्टे असतात. या दुर्मिळ बेदाग जिराफची लांबी सुमारे 6 फूट आहे. या जिराफाच्या बाळाचे नाव अद्याप देण्यात आलेले नाही. यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सोशल मीडियाची मदत घेतलीये आणि लोकांनाच ऑप्शन देऊन त्यांना वोट करायला सांगितलंय.
एवढ्या अनोख्या जिराफाचा जन्म कसा झाला?
31 जुलै रोजी जन्मलेला हा जिराफ तपकिरी रंगाचा आहे. सध्या प्राणिसंग्रहालय या जिराफची विशेष काळजी घेत आहे, पण या जिराफाचा जन्म इतका वेगळा कसा झाला, म्हणजे पट्ट्या नसलेल्या एकाच रंगाचा जिराफ जन्माला कसा आला, हे अद्याप कळू शकलेले नाही. याचा तपास अद्यापही तज्ञांकडून सुरु आहे.
पांढरे जिराफ
आपल्या अनोख्या रंगामुळे चर्चेत आलेला हा एकमेव जिराफ नाही. 2016 साली टांझानियाच्या तरंगीरे नॅशनल पार्कच्या जंगलात पांढऱ्या रंगाच्या जिराफांचे कुटुंब पहिल्यांदा दिसले होते. या कुटुंबात एक मादी जिराफ आणि दोन चिमुकल्या जिराफांचा समावेश होता. यानंतर पांढऱ्या जिराफांचं हे कुटुंब केनियाच्या गारिसा काउंटीमध्येही फिरताना दिसले. 2020 मध्ये शिकारींनी या पांढऱ्या जिराफांची शिकार केली ज्यात एक मादी जिराफ आणि एक चिमुकली जिराफ मारली गेली, पण दुसरा बेबी जिराफ बचावला, त्यानंतर तो जगातील एकमेव पांढरा जिराफ ठरला.