ओला राईड रद्द, रिक्षा चालकाकडून मुलीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल…

Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ऑटोचालक दुसऱ्या रिक्षेमध्ये बसलेल्या महिलेवर राग काढताना दिसत आहेत. यावेळी दुसरा चालकही त्याच्या सीटवर बसला आहे. तो मुलीवर ओरडत आहे. तुझा बाप आम्हाला गॅस देतो का?

ओला राईड रद्द, रिक्षा चालकाकडून मुलीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल...
viral video
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 4:28 PM

सध्या कुठे रिक्षा प्रवास करायचे असेल तर ओलाद्वारे बुकींग केले जाते. काही मिनिटांत रिक्षा तुमच्या जवळ येते. ओलासंदर्भात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. मुलीने ओला राईड रद्द केल्यामुळे रिक्षा चालकाने तिला मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर युजरकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचे लायसन रद्द करण्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार कर्नाटकातील आयटी सिटी असलेल्या बंगळुरुमध्ये घडला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.

कर्नाटक पोर्टफोलिओवर एक्स हँडलवर व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यात महिलांची सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे म्हटले आहे. फक्त राइड रद्द केल्यामुळे रिक्षा चालकाने मुलीला भरदिवसा मारहाण केली. मग निर्जन भागात काय प्रकार होईल? अशा प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहेत. त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याने केलेला प्रकार फक्त धोकादायक नाही तर बंगळुरु शहराची प्रतिमा खराब करणारे आहे, असे इंटरनेट युजर म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक ऑटोचालक दुसऱ्या रिक्षेमध्ये बसलेल्या महिलेवर राग काढताना दिसत आहेत. यावेळी दुसरा चालकही त्याच्या सीटवर बसला आहे. तो मुलीवर ओरडत आहे. तुझा बाप आम्हाला गॅस देतो का? यादरम्यान ती मुलगी सतत विचारत की, तुम्ही आमची राइड कधी रद्द करतात तेव्हा…? त्यानंतर मुलीने पोलिसात जाण्यास सांगितले. यावर ऑटोचालकानेही पोलिसांकडे जा? असे सांगितले.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चालकाला अटक केल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरानंतर ओलाकडून त्या रिक्षा चालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.