Viral : गवंडीकाम करणारी युवती बनली एका प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर, वाचा सविस्तर
ब्रिटन(Britain)ची एकमेव महिला, जी आपल्या देशात वीटकाम आणि गवंडी (Mason) म्हणून काम करून सोशल मीडिया स्टार (Social Media Star) बनली आहे, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ब्रिटन(Britain)ची एकमेव महिला, जी आपल्या देशात वीटकाम आणि गवंडी (Mason) म्हणून काम करून सोशल मीडिया स्टार (Social Media Star) बनली आहे, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, ट्रोल्सर्सनी तिची खिल्ली उडवली आणि तिला कुरूप संबोधून ट्रोल केलं. आता तिनंही यासर्वाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एखादी महिला वेगळं काहीतरी करत असेल तर त्याला समाजातून पाठिंबाच मिळायला हवा, मात्र काहीवेळा समाजातील विकृती त्यांना पुढे जाऊ देत नाही, अशावेळी जशास तसं उत्तर त्यांना देणं अपेक्षित असतं. या महिलेनंही तेच केलंय.
दिसण्यावरून केलं ट्रोल
गवंडी काम करणाऱ्या महिलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती विटा कशी रचते, कशी सर्वचं कामं करते. यासंबंधीचे अनेक व्हिडिओही तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डेली स्टारच्या वृत्तानुसार, या व्हायरल मुलीचं नाव डार्सी रिचर्ड्स (Darcie Richards) आहे. तिच्यावर कमेंट करताना काही ट्रोलर्स म्हणाले, की ती दिसायला कुरूप आहे आणि सुंदर नाही. ट्रोलर्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी असंही म्हटलं, की गवंडीचं काम करताना ती खूप हळूहळू काम करते.
टिकटॉकवर उडवली खिल्ली
इंग्लंडच्या ओल्ड बकेनहॅममधील नॉरफोकमध्ये राहणाऱ्या डार्सीची टिकटॉकवर अनेकांनी खिल्ली उडवली आहे. तिनं काही ट्रोलर्सना उत्तर दिलं. ती म्हणते, की महिलादेखील बांधकाम करू शकतात. दुसर्या व्हिडिओमध्ये नकारात्मक कमेंट करताना यूझर म्हणाला होता, की ही वेगळीच गोष्ट आहे, मी आजपर्यंत कोणत्याही महिलेला असं करताना पाहिलं नाही.’
View this post on Instagram
अनेकांनी केलं समर्थन
अनेक व्हिडिओंमध्ये ती शिडीवर चढताना, गवंडीचं काम करताना, विटा टाकताना दिसत आहे. आज महिला स्वतंत्र आणि सशक्त असल्याचंही तिनं अनेक ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. त्याचवेळी, तिनं असंही म्हटलं, की बरेच लोक तिची प्रशंसा करतात, परंतु बहुतेक पुरुष तिच्यावर टीका करतात. तिनं सांगितलं, की जेव्हा तिनं एका व्हिडिओमध्ये उत्तर दिलं तेव्हा 16 हजार लोकांनी तिच्या समर्थनार्थ कमेंट्स केल्या.
स्क्रफ वर्कवेअरची ब्रँड अॅम्बेसेडर
व्हायरल मेसन डार्सी रिचर्ड्स तिच्या कामामुळे इतकी लोकप्रिय आहे, की तिला ब्रिटनच्या लोकप्रिय ब्रँड स्क्रफ वर्कवेअर(Scruff workwear)ची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलं आहे.