लाल साडी, जबरदस्त ठुमके आणि…ऊ अंटावा, ऊ अंटावा! अस्सा डान्स वाह वाह
या व्हिडीओमधील मुलगी इतका जबरदस्त डान्स करतीये की तुम्ही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.
सोशल मीडियामुळे लोकांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आजच्या युगात सगळेच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. लोक त्यांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पटकन पोस्ट करतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. अनेक लोकांचे तर डान्सचे व्हिडीओच जास्त व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, चित्रपटाची क्रेझ, त्यातील गाणी आणि संवाद यांची क्रेझ अजूनही कायम आहे.
या चित्रपटाच्या गाण्यावर बनवलेला एक डान्स व्हिडिओ नोएडाच्या एका कलाकार आणि खुशी शर्मा नावाच्या डान्सरने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे, ज्यामुळे लोक तिच्यासाठी वेडे झालेत. खुशीने पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यावर असे ठुमके मारलेत की ते बघून तुम्हीही थक्क व्हाल.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत खुशीने लिहिले की, या व्हिडिओसाठी तिच्या हृदयात एक खास स्थान आहे, त्यामुळे ती हा व्हिडिओ रिपोस्ट करत आहे. खरंतर हा व्हिडिओ 2022 चा आहे, जो सर्वात जास्त व्हायरल झाला.
खुशी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. फेसबुक असो वा इन्स्टाग्राम, खुशीचे चाहते तिची पोस्ट सगळीकडे व्हायरल करतात. लाखोंच्या संख्येने फॅन फॉलोअर्स असलेल्या खुशीची ही रिपोस्ट स्टाइलही लोकांना खूप आवडली आहे.