मुंबई : स्वयंपाकघरात स्वयंपाक करणं दिसतं तेवढं सोपं काम नक्कीच नाही. एखादा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याला लागणारी तयारी, त्यासाठीचा वेळ याची जुळवाजुळव करताना दमछाक होते. अश्यात तुम्ही जर किचनमध्ये नवी असाल तर तुमच्यासाठी हा संघर्ष अधिक बिकट होतो. काहीवेळा अनेकांना भाजतं, काहींना चटके बसतात, अपघात होता. त्याचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (Viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूणी (Girl Viral video) पहिल्यांदा स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात आलेली दिसतेय. तिच्यासोबतचा घडलेला अपघातमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केलीये.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पहिल्यांदा स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात आलेली दिसतेय.या महिलेने कॅमेरा चालू ठेवलाय आणि ती जेवण बनवतानाचा व्हीडिओ शूट करत आहे. ती किचनमध्ये उभी राहून जेवण बनवतेय. या दरम्यान आजूबाजूला धुराचे लोट दिसायला लागतात. काही वेळातच तिच्या लक्षात येतं की तिच्या मागच्या पॅनला आग लागली आहे. यानंतर ती आग विझवण्यासाठी ती बेसिनजवळ पॅन घेते. पण आग कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढते. यानंतर ती हेल्प हेल्प असं ओरडायला लागते. अन् इकडे तिकडे पळू लागते. थोडीशी चूक झाली असती तर तिला आग आणखी पसरली असती.
Cooking is hard pic.twitter.com/HWFEISM2to
— Barstool Sports (@barstoolsports) May 12, 2022
केली कॅरॉन असं या महिलेचं नाव आहे. ही महिला अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहाते. तिचे वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे व्हीडिओ पोस्ट करत असते. जेव्हा ती पहिल्यांदा स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा ती तिच्या चाहत्यांसोबत लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं. सध्या तिचा हा जेवण बनवतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.