साडी नेसून जबरदस्त डान्स, किलर एक्सप्रेशन्स ‘मैं तो सज गई रे सजना के लिए’
हा व्हायरल व्हिडिओ एका मुलीचा आहे, जो 'मैं तो सज गई रे सजना के लिए' या गाण्यावर डान्स करते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मागच्या बॅकग्राऊंडमध्ये गाणं वाजत आहे.
मुंबई: ज्यांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळू शकलं नाही, त्यांच्यासाठी सोशल मीडिया वरदान आहे. तरुण पिढीसाठी हे एक व्यासपीठ बनले आहे, जिथून त्यांना एक वेगळी ओळख मिळतीये. जिथे त्यांना प्रवेश नव्हता अशा लोकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून आपली प्रतिभा पोहोचवण्यात ते यशस्वी होतात. कारण आजच्या युगात इंटरनेटचा वापर न करणारे फार कमी लोक असतील. अशा तऱ्हेने गायन किंवा नृत्यात करिअर करण्यासाठी काही तरुणांनी या इंटरनेटला आपलं हत्यार बनवलं आहे. ते आपल्या डान्सचे व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. जे युजरला आवडल्यास व्हायरल होतात. बाबा जॅक्सन सारखी अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांना इंटरनेटने रातोरात स्टार बनवले.
हा व्हायरल व्हिडिओ एका मुलीचा आहे, जो ‘मैं तो सज गई रे सजना के लिए’ या गाण्यावर डान्स करते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मागच्या बॅकग्राऊंडमध्ये गाणं वाजत आहे आणि ती त्यावर आपला परफॉर्मन्स देत आहे.
ही मुलगी ज्या आयकॉनिक गाण्यावर नाचताना दिसत आहे, ते गाणं मुळात आशा भोसले यांनी गायलं असून ‘सौदागर’ (१९७३) या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे, हे गाणं गौरव दासगुप्ता यांनी मॉडर्न ट्विस्टसह रिक्रिएट केलं आहे. गायिका श्रुती राणे हिने या रोमँटिक गाण्याला आवाज दिला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये ती मुलगी गाण्यावर अप्रतिम एक्सप्रेशन देताना दिसत आहे. डान्स करताना या मुलीने अतिशय भन्नाट एक्सप्रेशनही दिले आहे. ही मुलगी आपल्या किलर स्टेप्सने इन्स्टाग्रामला आग लावत आहे.
गाण्याच्या प्रत्येक तालावर नाचणारी ही मुलगी हा व्हिडिओ खूपच सुंदर बनवत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ थेजिस्टिक्स नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे.