डोळ्यांवर पट्टी बांधून मुलगी करते दैनंदिन कामे लोक म्हणतात ‘निंजा’! VIDEO
या मुलीने आपल्या अप्रतिम कलेने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. व्हायरल क्लिपमध्ये ती मुलगी डोळ्यांवर पट्टी बांधून ननचक्कूने काही भन्नाट स्टंट्स दाखवते जे तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील.
सध्या सोशल मीडियावर एका चिनी मुलीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही मुलगी ननचक्कूने इतकी जबरदस्त मार्शल आर्ट्स सादर करते की तुम्ही तिला पाहूनच आश्चर्यचकित व्हाल. या मुलीने आपल्या अप्रतिम कलेने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. व्हायरल क्लिपमध्ये ती मुलगी डोळ्यांवर पट्टी बांधून ननचक्कूने काही भन्नाट स्टंट्स दाखवते जे तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील. आता ही व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर लोक या मुलीला निंजा म्हणत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिनी मुलगी मार्शल आर्टच्या माध्यमातून दैनंदिन कामे करताना दिसत आहे. त्या महिलेच्या हातात एक ननचक्कू आहे. हे एक असे शस्त्र आहे ज्यामध्ये दोन काड्या एकमेकांना साखळीने जोडतात.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी नानचक्कूच्या मदतीने मेणबत्त्यांची रांग उडवत आहे. इतकंच नाही तर या मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून काही भन्नाट स्टंटही दाखवले आहेत.
After a long time of practicing, our work will become natural, skillfull, swift, and steady. —@brucelee pic.twitter.com/Gkshbsj7kf
— Vala Afshar (@ValaAfshar) January 29, 2023
वाला अफसर नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “खूप सरावानंतर आमचे काम नैसर्गिक, कार्यक्षम, जलद आणि स्थिर होईल.” आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे, तर 3 लाखांहून अधिक व्ह्यूजदेखील मिळाले आहेत. याशिवाय लोकही आपल्या प्रतिक्रिया भरभरून नोंदवत आहेत.
एका युजरने कमेंट केली, ‘सुपर कूल!’ तर दुसरा युजर म्हणतो, सराव कोणत्याही व्यक्तीला परफेक्ट बनवतो.