VIDEO | लहान मुलगी हात न वापरता फोन स्क्रोल करते, जुगाड पाहून लोक म्हणाले, ‘याला म्हणतात अधिक मेंदूचा वापर’
Jugaad | व्हायरल व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी हाताचा वापर न करता मोबाईल स्क्रोल करीत आहे. त्या मुलीचा जुगाड पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ रोज पाहायला मिळतात. त्यापैकी काही व्हिडीओ (viral video) असे असतात की, लोकांना विचार करायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ असे असतात की, त्यातून आपल्याला कायतरी शिकायला मिळतं. सध्या सगळ्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन आहेत. काही मुलं त्यातून इतकं काही शिकली आहेत की, ते त्यांच्या आईवडिलांना त्यातील गोष्टी सांगत असतात. त्याचबरोबर रोज मोबाईलमध्ये (mobile) नवीन गोष्टी शोधत असतात. आता तुम्हाला असं वाटतं असेल की, आज आम्ही या विषयावर का बोलत आहे ? कारण एक मुलगी आपल्या हाताचा उपयोग न करता मोबाईल स्क्रोल करीत आहे. तो व्हिडीओ (trending video) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यांच्यावर नेटकरी सुध्दा चांगल्या वाईट प्रतिक्रिया देत आहेत.
मुलीचा जुगाड लोकांना आवडला
व्हायरल झालेला व्हिडीओ ‘आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ह्यूमन रेस’या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. ती लहान मुलगी आपल्या अंथरुनावर मोबाईल घेऊन बसली आहे. त्यावेळी हा न लावता ती आपला मोबाईल स्क्रोल करीत आहे. त्या मुलीने केलेला जुगाड अनेकांना आवडला आहे. तुम्ही विचारात पडला असाल की, हात न लावता ती मुलगी स्क्रोल करीत आहे, त्यासाठी तुम्ही एकदा व्हिडीओ पाहा.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) June 15, 2023
व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला
त्या मुलीचा हा जुगाड अनेकांना आवडला आहे. तो छोटा व्हिडीओ २० लाख लोकांनी अधिकवेळा पाहिला आहे. एक नेटकऱ्याने सांगितले की, काय त्या मुलीने डोकं लावलं आहे. त्या वस्तू खरा उपयोग त्या मुलीने केला आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, ‘याला म्हणतात अधिक मेंदूचा वापर’ असे व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात.