Viral : गालावर खळी हवीये? ‘हिनं’ केला अनोखा Jugaad; Videoमध्ये पाहा, काय Trick वापरली…
Dimple Girl video : हसरा चेहरा (Smily face) सर्वात सुंदर (Beautiful) मानला जातो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर खळी (Dimple) असेल तर ते तुमचे स्मित आणि सौंदर्य वाढवते. एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये एक मुलगी खळी बनवण्याची ट्रिक शेअर करत आहे.
Dimple Girl video : गालावरची खळी आपल्याला शाहरुख खान, प्रीती झिंटा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांसारख्या आपल्या आवडत्या चित्रपटातील कलाकारांची आठवण करून देते. चेहऱ्याची ही विशेषता नेहमीच आकर्षण, सौंदर्य आणि तारुण्याचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हसरा चेहरा (Smily face) सर्वात सुंदर (Beautiful) मानला जातो आणि जर तुमच्या चेहऱ्यावर खळी (Dimple) असेल तर ते तुमचे स्मित आणि सौंदर्य वाढवते. याच्या मदतीने तुम्हाला खूप वेगळी आणि सुंदर स्माइल मिळू शकते. खळीदेखील सौंदर्याची निशाणी मानली जाते. ज्यांच्या गालावर खळी नसेल, त्या लोकांना वाटते, की आपल्याही गालावर खळी असावी. आता असे तुम्हाल वाटत असेल तर एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा एका मुलीचा व्हिडिओ आहे, तिच्या गालावर कशी खळी येते, ते तुम्हीच पाहा…
खळी बनवण्याची ट्रिक
सोशल मीडियावर काहीतरी वेगळे करणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या प्रतिभेवर यूझर्सदेखील प्रचंड प्रेम करतात. यामुळेच हा व्हिडिओ इंटरनेटच्या दुनियेत येताच व्हायरल होतो. अलीकडच्या काळात लोकांमध्ये एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये एक मुलगी खळी बनवण्याची ट्रिक शेअर करत आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक मुलगी दिसत आहे, जिच्या गालावर खळी नाही, त्यानंतर ती ‘मार्कर पेन’ घेऊन तिच्या गालावर एक खूण करते आणि नंतर त्याला व्यवस्थित गालावर लावते. यानंतर ती हसते तेव्हा खळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. हे पाहून यूझर्स थक्क झाले आहेत. इन्स्टाग्रामवर adultgram_ नावाच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
‘निन्जा टेक्निक’
हा व्हिडिओ खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की मुलीला खळी आधीच होती, ती आपल्याला फसवत आहे. तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हे जुगाड भारताबाहेर जाऊ नये. दुसऱ्या यूझरने लिहिले, की ‘चेहरे पर डिंपल बनाने की निन्जा टेक्निक.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.