काळी मांजर समजून ब्लॅक पँथर पाळला, पुढे काय झालं पाहा…
समजा तुम्ही एखादी काळी मांजर आणली आणि तो ब्लॅक पँथर निघाला तर? बापरे! किती भयानक आहे हा विचार सुद्धा. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका महिलेने एक काळी मांजर घरी आणली. ती मांजर खूप जखमी होती. जसजशी ती मांजर मोठी होऊ लागली तसतसं तिच्या लक्षात आलं की ही मांजर नाही ब्लॅक पँथर आहे.
मुंबई: सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे ज्यावर खूप प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात. मग ते व्हिडीओ कधी डान्सचे, कधी गाण्याचे तर कधी लहान मुलांचे असतात. प्राण्यांचे सुद्धा अनेक व्हिडीओ यात असतात. आता हा व्हिडीओच बघा. विचार करा जर तुम्ही एखादा ब्लॅक पँथर घरात पाळला तर? याहीपेक्षा असा विचार करा की तुम्ही एखादी मांजर ब्लॅक पँथर म्हणून पाळली तर? धक्काच बसेल ना? विचार सुद्धा करवत नाही ना? असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, यात चक्क एका मुलीने मांजर समजून एक ब्लॅक पँथर पाळलाय. ब्लॅक पँथर तोही एका कुत्र्यासोबत. आहे ना धक्कादायक? ब्लॅक पँथर सोबत एक कुत्रा सुद्धा मोठा झालाय.
हा ब्लॅक पँथर आहे
एका मुलीला मांजरांची खूप आवडत होती. तिला मांजर पाळायची होती. ती एक दिवस जाते आणि एक छोटीशी, गोंडस काळ्या रंगाची मांजर घेऊन येते. ही मांजर लहानाची मोठी होत जाते तरी या मुलीला कळत नाही की हा ब्लॅक पँथर आहे. ब्लॅक पँथर ज्याला ती मांजर समजत असते त्याच्या सोबत एक कुत्र्याचं पिल्लू सुद्धा ती पाळत असते. या महिलेने या ब्लॅक पँथरला आणि कुत्र्याला सोबत वाढवलंय त्यामुळे या दोघांमध्येही खूप चांगली मैत्री आहे. या महिलेचं नाव व्हिक्टोरिया आहे.
कुत्रा आणि ब्लॅक पँथर गुण्यागोविंदाने नांदतायत
व्हिक्टोरिया या ब्लॅक पँथर आणि कुत्र्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते. दोघेही एकाच बादलीत पाणी पितात, एकत्र जेवतात- झोपतात. तिच्या बऱ्याच व्हिडीओंना लाखो लोकांनी पाहिलंय. रोज खूप लोकं या ब्लॅक पँथर आणि कुत्र्याचा व्हिडीओ बघायला येतात. हा ब्लॅक पँथर जेव्हा महिलेने घरी आणला होता तेव्हा तो खूप जखमी होता. आता तो निरोगी आहे. तिने सोबत वाढवलेले कुत्रा आणि ब्लॅक पँथर गुण्यागोविंदाने नांदतायत. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात.