पुन्हा एकदा, ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटर! असं कोण स्कुटी चालवतं?
यावरून स्कूटी गर्ल्सना खूप ट्रोलही केलं जातं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं घडलं, मुलीने योग्य वेळी ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलरेटर फिरवला आणि मग जे घडलं त्यावर सगळेच हसत आहेत.
इंटरनेटवर कधी काय पाहायला मिळेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. इथे व्हायरल होणारे व्हिडिओही असेच काहीसे आहेत. पाहिलं तर विश्वास ठेवणं फार कठीण होऊन बसतं. आता पाहा हा व्हिडिओ, एका मुलीला स्कूटी पार्क करायची आहे, पण तिने असे काही केले की यामुळे स्कुटी थेट गेटवर चढते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. युजर्स हे व्हिडिओ तर बघत आहेतच, पण एकमेकांना शेअर ही करत आहेत.
मुलींना स्कूटी चालवायला किती आवडते हे आपल्या सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. पण असं असूनही अनेकदा स्त्रिया अशी चूक करतात, त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो. खरं तर मुली घाईघाईत ब्रेक ऐवजी एक्सेलेरेटर फिरवतात. यावरून स्कूटी गर्ल्सना खूप ट्रोलही केलं जातं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं घडलं, मुलीने योग्य वेळी ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलरेटर फिरवला आणि मग जे घडलं त्यावर सगळेच हसत आहेत.
या व्हिडिओमध्ये एक मुलगी हेल्मेट घालून स्कूटी चालवताना दिसत आहे. तिच्याकडे बघून तिला स्कुटी पार्क करायचं आहे असं वाटतं. मग अचानक ती स्कूटीचे ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलरेटर फिरवते. ज्यानंतर स्कूटी अनियंत्रित होते. ती स्कूटी पार्किंग ऐवजी अशा ठिकाणी ठेवते की ती तिथून उतरवण्यासाठी आता दोन लोकांची गरज भासणार आहे.
वाह क्या Entry मारी है दीदी ने ?❤️ pic.twitter.com/VdFcT11wOO
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) March 16, 2023
हसना जरूरी है नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 20 हजारांहून अधिक लोकांनी ही क्लिप पाहिली असून कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलं, ‘या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी स्कूटी चालवायला शिकणार नाही…’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘गेट कुणी उघडलं नाही तर बिचारे काय करतील… आणखी एका युजरने लिहिलं, ‘अशा प्रकारे पार्किंग कोण करतं भाऊ?’