प्रेमात मुला-मुलीने केली होती आत्महत्या, 6 महिन्यानंतर चूक मान्य करत घरच्यांनी उचललं हे पाऊल
प्रियकर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकमेकांना भेटून असा निर्णय घेतला, ज्यामुळे लोकांची झोप उडालीये.
अहमदाबाद: गुजरातमधील तापी येथील न्यू नेवाळा गावात प्रियकर दाम्पत्याच्या मृत्यूनंतर प्रियकर-प्रेयसीचं लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियकर-प्रेयसीच्या कुटुंबियांनी एकमेकांना भेटून असा निर्णय घेतला, ज्यामुळे लोकांची झोप उडालीये. मृत्यूनंतर त्यांनी या दोघांचे लग्न करण्यासाठी प्रियकर-प्रेयसीचा पुतळा तयार केला आणि आदिवासी परंपरेनुसार लग्न केले. हे दाम्पत्य हयात असताना त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून घरच्यांनी त्यांचा पुतळा बनवून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
तापी जिल्ह्यातील न्यू नेवाळा गावात ही घटना घडली आहे, जिथे प्रेमीयुगुलांचे मृत्यूनंतर लग्न लावण्यात आले होते. गणेश पाडवी याचे शेजारच्या जुने नेवाळा गावातील रंजना पाडवी हिच्यावर मनापासून प्रेम होते. मात्र दोघांच्या घरच्यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं.
दोघांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर करण्यास कुटुंबीय तयार नव्हते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला कंटाळून दोघांनी गेल्या वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी एकाच दोरीने आत्महत्या केली होती. प्रियकर दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही.
घरच्यांनाही कुठेतरी चूक झाल्याचं वाटलं, म्हणून घरच्यांनी सामाजिक प्रथा म्हणून गणेश आणि रंजनाची मूर्ती तयार केली आणि त्याच मूर्तीचं लग्न करायचं ठरवलं, त्यासाठी घरच्यांनी लग्नपत्रिकाही छापल्या.
लग्नाच्या दिवशी जिवंत लोकांचे लग्न झाले आणि आदिवासी परंपरेनुसार दोन मृत प्रियकरांचे लग्न झाले, त्याच पद्धतीने प्रियकराचा पुतळा शेजारच्या जुने नेवाळा गावात नेण्यात आला. वधूच्या घरच्यांनी वधूशी लग्न करून तिला पाठवलं. लग्नात लोकांसाठी खाण्या-पिण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.