अशी Girlfriend कुणाला नको? परीक्षा होती boyfriend ची, पण तिने केलं असं काही की…
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही मुलगी सरकारी कर्मचारी असल्याचं म्हटलं जात आहे
गुजरात: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या अनेक विचित्र गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. नुकतंच गुजरातमधून एक मुलगी परीक्षेत पेपर देण्यासाठी गेली होती, अशी घटना समोर आली आहे. मुद्दा हा आहे ती तिच्या बॉयफ्रेंडच्या जागी हा पेपर द्यायला गेली होती. ती पेपर देत होती पण जागीच पकडली गेली. यानंतर ती जगभरात व्हायरल झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार गुजरातमधील सुरत येथील वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठात ही घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही मुलगी सरकारी कर्मचारी असल्याचं म्हटलं जात आहे तर तिचा प्रियकर कॉलेजमध्ये आहे.
ही मुलगी त्याच प्रियकरासाठी परीक्षा द्यायला गेली होती. प्रियकर बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याची परीक्षा होती.
आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली की, प्रियकर स्वतः उत्तराखंडमध्ये सुट्टीवर गेला होता आणि त्याऐवजी ही मुलगी परीक्षा द्यायला गेली होती.
त्यासाठी मुलीने मुलाऐवजी आपला पासपोर्ट साइजचा फोटो ॲडमिट कार्डवर चिकटवला आणि गेटला चकवा देत परीक्षा भवन गाठले.
पण तिची पोल अशा प्रकारे उघडली की, त्याच्या शेजारी बसलेल्या एका मुलाने दक्षता पथकाला सांगितले की, आदल्या दिवशीच्या परीक्षेत एक मुलगा येथे बसला असल्याने मला या मुलीवर संशय आहे.
त्यानंतर तपास केला असता ही बाब समोर आली. विशेष म्हणजे आरोपी प्रेयसीही याच कॉलेजमधून बीकॉम पासआऊट आहे.
यानंतर टीमने या डमी उमेदवाराला पकडलं. कॉलेज प्रशासनाने कारवाई करून मुलाच्या सर्व परीक्षा रद्द करून त्याच्यावर बंदी घातली, तसेच मुलीवर कारवाई करण्याची शिफारसही केली.