सनम बेवफा! गर्लफ्रेंड ज्याच्यासोबत फिरते त्यालाच मेसेज केला…प्लॅनिंग केलं! सोशल मीडियावर स्क्रीनशॉटचा धुमाकूळ
मुलीच्या बॉयफ्रेंडने तिच्या नव्या पार्टनरला एक गोष्ट सांगितली आणि त्याने होकार दिला. मुलीचा बॉयफ्रेंड "ब्रो कोड" चा वापर करतोय, तेही उत्तम पद्धतीने!
हा किस्सा सगळ्यात वाढीव आहे. असे खूप किस्से तुम्हालाही माहित असतील. दोन जण एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यातला एक जण एका सोबत असताना सुद्धा दुसऱ्या सोबत फिरत असतो. थोडक्यात काय तर चिट करतो, धोका देतो, खोटं बोलतो! असे खूप किस्से ऐकले असतील तुम्ही, तेही तुमच्याच आजूबाजूचे. हा ही किस्सा तसाच आहे. फक्त ना यात जरास ट्विस्ट आहे. दोन जणांच्या नात्यात एक जण धोका देतोय आणि दुसऱ्याला माहित आहे की समोरचा आपल्याला धोका देतोय. तो आपल्याला कुणासोबत धोका देतोय तेही त्याला माहित आहे. मग पुढे काय होतं? हाच आहे गोष्टीतला ट्विस्ट!
आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देते असं बॉयफ्रेंडला कळतं. आपल्याला अंधारात ठेवून ती जिच्यासोबत फिरत असते तो त्या मुलालाच डायरेक्ट मेसेज करतो.
याच मेसेजचा स्क्रीनशॉट सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालतोय. लोकं यावर प्रचंड हसतायत. मुलीचा बॉयफ्रेंड त्या मुलाला मेसेज करतो ज्या मुलासोबत ती त्याला न सांगता फिरते. तो त्याला पहिलाच मेसेज करतो, “यो ब्रो!”
मुलीच्या बॉयफ्रेंडने तिच्या नव्या पार्टनरला एक गोष्ट सांगितली आणि त्याने होकार दिला. मुलीचा बॉयफ्रेंड “ब्रो कोड” चा वापर करतोय, तेही उत्तम पद्धतीने!
मुलगा पुढे म्हणतो, मी तान्याचा बॉयफ्रेंड आहे. मग नवीन पार्टनर म्हणतो ठीक आहे, बोल! यानंतर मुलीचा बॉयफ्रेंड समजावतो की, ‘ऐक, मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे. मला माहित आहे की माझी गर्लफ्रेंड मला फसवत आहे आणि तू तिच्या दुसरा बॉयफ्रेंड आहेस .. तुला माहीत आहे काय? मला या गोष्टीशी काहीच प्रॉब्लेम नाही. कारण ती जर आनंदी असेल तर मीसुद्धा आनंदी आहे.खरं तर, माझीसुद्धा एक साइड गर्लफ्रेंड आहे. मी तुला म्हणणार होतो की जर या रविवारी तु तान्यासोबत वेळ घालवला तर मी सुद्धा माझ्या दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला बाहेर जाऊ शकतो.”
View this post on Instagram
यावर तान्याचा दुसरा बॉयफ्रेंड सुद्धा तयार होतो. तो म्हणतो, “यो ब्रो! काळजी करू नकोस मी तुझ्या गर्लफ्रेंडची काळजी घेईन”
आता नेमका हाच स्क्रीन शॉट व्हायरल होतोय. या गप्पा वाचून लोक खळखळून हसत आहेत. हा स्क्रीनशॉट घंटा नावाच्या इन्स्टाग्राम पेजने पोस्ट केला आहे.
( हा स्क्रीन शॉट प्रँक किंवा जोक किंवा व्हायरलच्या उद्देशाने लोक शेअर करू शकतात. या स्क्रीनशॉटला आम्ही दुजोरा देत नाही.)