महिन्याच्या 200000 पगारावर “गर्लफ्रेंडची नोकरी”! 2 युवक गर्लफ्रेंडच्या शोधात
त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात दिलीये. या मुलांच्या एका मैत्रिणीने ही जाहिरात पोस्ट केलीये. आता ही जाहिरात चर्चेचा विषय बनलीय.
काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर नवरा नको अशी एक जाहिरात प्रचंड व्हायरल होत होती. अशा हटके जाहिराती लगेच व्हायरल होतात. अशीच अजून एक जाहिरात व्हायरल होतीये. दोन तरुणांना गर्लफ्रेंड हव्या असतात. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात दिलीये. या मुलांच्या एका मैत्रिणीने ही जाहिरात पोस्ट केलीये. आता ही जाहिरात चर्चेचा विषय बनलीय. थायलंडची रहिवासी असलेल्या या महिलेने दोन चिनी मित्रांच्या वतीने पोस्ट केलेल्या जाहिरातीत लिहिलंय की, तिच्या मित्रांना थाई गर्लफ्रेंड हवी आहे.
त्याबदल्यात त्यांना, गर्लफ्रेंडला दरमहा 2.16 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. गर्लफ्रेंडनी काम चांगलं केलं तर त्यांना 2 लाख रुपयांव्यतिरिक्त पैसेही मिळतील, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
फेसबुक युजर ओके माई माई यांनी गेल्या आठवड्यात अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘माझे दोन चिनी मित्र गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत. प्रेयसीचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. गर्लफ्रेंड्सना पगार म्हणून 2.16 लाख रुपये मिळतील, त्यांना तुमचं काम आवडलं तर त्याहीपेक्षा जास्त. दोघेही माझे मित्र आहेत, ते नीट आणि क्लीन आहेत”
अटीही त्यांनी स्पष्ट केल्या. पोस्टनुसार, ज्या उमेदवारांना गर्लफ्रेंड म्हणून काम करायचे आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेऊ नये. ते कामात चांगले असले पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या समस्येशी ती झगडत नसावी. त्यांना चिनी भाषा बोलता आली पाहिजे.
ओके माई माईची ही पोस्ट वाचून थायलंडच्या अनेक महिलांनी या नोकरीची इच्छा व्यक्त केली. कमेंट सेक्शनमध्ये काही महिलांनी नी हाओ (हॅलो) हा चिनी शब्दही लिहिला होता.त्याचबरोबर अनेक युजर्सनी या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या इतर मैत्रिणींनाही टॅग केलंय.