GK Quiz | कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो? सांगा
कोणते फळ पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? दुर्बिणीचा शोध कोणी लावला?
मुंबई: आजच्या काळात कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची खूप गरज असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. तुम्ही खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला उत्तरं आली नाहीत तर ती तुम्ही नीट वाचा आणि लक्षात ठेवा.
प्रश्न 1 – कोणते फळ पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात?
उत्तर 1 – अननस हे असे फळ आहे ज्याला पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात.
प्रश्न 2 – भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
उत्तर 2 – डॉल्फिन मासा हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.
प्रश्न 3 – ताजमहाल कोणत्या मुघल शासकाने बांधला?
उत्तर 3- ताजमहाल मुघल बादशहा शाहजहानने आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधला होता.
प्रश्न 4 – दुर्बिणीचा शोध कोणी लावला?
उत्तर 4 – दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने लावला.
प्रश्न 5 : मोराचे आयुर्मान किती असते?
उत्तर 5- मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याचे आयुर्मान सुमारे 5 वर्षे आहे.
प्रश्न 6- कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो?
उत्तर 6 – खरे तर चातक पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो.