जगातील एका देशाला गिळतोय समुद्र; 15 वर्षात होईल नकाशावरून गायब
जागतिक तापमानवाढीमुळे किरिबाती हा प्रशांत महासागरातील बेटराष्ट्र मोठ्या संकटात सापडला आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येत्या काही वर्षांत हा देश पूर्णतः बुडण्याचा धोका आहे. किरिबातीची उंची समुद्रसपाटीपासून फक्त दोन मीटर आहे, त्यामुळे तो ग्लोबल वार्मिंगचा सर्वात मोठा बळी ठरणार आहे. सरकारने विकसित राष्ट्रांकडून मदत मागितली असली तरी, कुठलाही खरा उपाययोजना आतापर्यंत दिसत नाही.

ग्लोबल वार्मिंग आज जगासाठी गंभीर धोका ठरली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे जगातील असंख्य देश प्रभावित झाले आहेत. प्रशांत महासागरजवळ असलेला अत्यंत सुंदर देश किरिबाती त्यापैकीच एक आहे. वैज्ञानिक आणि जलवायू तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार, येत्या 15 ते 25 वर्षात हा संपूर्ण देश समुद्रात विलिन होणार आहे. हा देश काही वर्षात जगाच्या नकाशावरून गायब होणार आहे. इथल्या खाणाखुणाही पाण्यात मिसळल्या जाणार आहेत.
किरिबाती देशाची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याची अत्यंत कमी असलेली उंची. समुद्रसपाटीपासून या देशाची उंची अवघ्या दोन मीटरने कमी आहे. त्यामुळे समुद्र स्तरातील छोट्याश्या वाढीने हा देश गंभीररित्या प्रभावित होतो. वैश्विक तापमानातील वाढ आणि ग्लेशियर वितळत असल्याने समुद्राचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे किरिबाती सारखा देश थेट संकटात सापडला आहे.
वाचा: पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं…
पूर्वी जमीन होती, आता…
या देशात एकूण 33 बेटे आहेत. छोट्या छोट्या कोरल बेटांनी ते बनलेले आहेत. या बेटांवर हळूहळू जमीन धसणे, पूर आणि खाऱ्या पाण्याच्या प्रवेशाची समस्या सातत्याने वाढत आहे. पूर्वी या ठिकाणी जमीन होती. आता तिथे समुद्र झाला आहे, असं स्थानिक लोक सांगतात. शेतजमीन आणि पिण्याचे पाणी दूषित झालं आहे. त्यामुळे लोकांचं जगणं कठिण झालं आहे.
कळकळीची विनंती, पण फायदा काय?
किरिबातीची राजधानी तरावा आहे. या बेटांवरील सर्वाधिक लोकसंख्या तरावामध्ये आहे. येथील सरकार आणि जनता, दोन्ही ग्लोबल वार्मिंगमुळे अडचणीत सापडले आहेत. विकसित देशांनी ग्लोबल वार्मिंगला गंभीरपणे घेतलं पाहिजे, अशी विनंती किरिबाती सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावरून अनेकदा केली होती. पण या सरकारचं कोणीही ऐकलं नाही.
असा बुडणार देश
किरिबाती केवळ एक देश नाहीये, तर ग्लोबल वार्मिंगमुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या बेटांवरील देशांसाठीचं एक प्रतिक ठरणार आहे. जर ग्लोबल वार्मिंगचा वेग नाही थांबला तर जगातील असंख्य देश पाण्याखाली बुडतील. हा धोका भारताच्या बेटावरील प्रदेशातही पाहायला मिळू शकतो.