Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral
लोकांना असं वाटतं, की प्राणी माणसासारखे बुद्धिमान (Wise) नाहीत. सोशल मीडियावर असे मजेशीर (Funny) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याच प्रकारातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याला पाहून तुम्ही शेळी (Goat) आणि गाढवा(Donkey)च्या डोकॅलिटीचं कौतुक कराल.
Animal Funny Video : अनेकदा लोकांना असं वाटतं, की प्राणी माणसासारखे बुद्धिमान (Wise) नाहीत. कारण ते अडचणीच्या काळात त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्यासारखा मेंदू चालवू शकत नाहीत. तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच स्वतःला चुकीचे समजाल. सोशल मीडियावर असे आश्चर्याचा धक्का देणारे आणि मजेशीर (Funny) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता त्याच प्रकारातला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला पाहून तुम्ही शेळी (Goat) आणि गाढवा(Donkey)च्या डोकॅलिटीचं कौतुक कराल. तुम्ही ऐकलं असेल, की जेव्हा ध्येय अवघड असतं तेव्हा ते गाठण्यासाठी एकीची गरज असते. हे केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतं. गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं टीमवर्क म्हणजे काय? व्हिडिओमध्ये बकरी आणि गाढवाच्या टीमवर्कला लोक पसंत करत आहेत.
बकरी गाढवाच्या पाठीवर
या व्हिडिओमध्ये एक बकरी गाढवाच्या पाठीवर उभी असल्याचं दिसत आहे. ती गाढवावर उभी राहून आपलं खाद्य घेतेय. म्हणजे झाडाची पानं चावू लागते. म्हणजे शेळीनं आपलं अन्न घेण्यासाठी गाढवाची मदत घेतली आणि पोट भरलं असं म्हणायचं आहे. प्राण्यांची समज आणि त्यांचं जुगाड पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय.
ट्विटरवर शेअर
हा व्हिडिओ ट्विटरवर @Yoda4ever पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यासोबत कॅप्शन लिहिलं आहे, ‘टीमवर्क’. या व्हिडिओला 71 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय लोक व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Teamwork..???? pic.twitter.com/x2vSmv0Wp3
— ?o̴g̴ (@Yoda4ever) February 3, 2022
‘ही खरी मैत्री’
एका यूझरनं याचं वर्णन नैसर्गिक शिष्टाचार म्हणून केलं आहे. त्याच वेळी, एक यूझरम्हणतो, ‘ही खरी मैत्री आहे.’ कोणीतरी लिहिलं आहे की मित्रासाठी फक्त मित्रच उपयोगी आहे, तर काही लोक हे दृश्यं पाहून हसले. यासोबतच लोकांचा असाही विश्वास आहे, की हा व्हिडिओ माणसांना शिकवत आहे, की एकजुटीनं आणि गरजूंना मदत केल्यानं कठीण कामदेखील शक्य आहे.