पाहावे ते नवलच! शेळीच्या पोटी माणसासारखे दिसणारे पिल्लू, हुबेहूब तोंड, शेपूटही नाही

शेळी मालकाने सांगितले, की सोमवारी त्याच्या शेळीने मानवी शरीराप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला. हे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याचा संपूर्ण चेहरा लहान मुलासारखा होता आणि मुलाला शेपूटही नव्हते

पाहावे ते नवलच! शेळीच्या पोटी माणसासारखे दिसणारे पिल्लू, हुबेहूब तोंड, शेपूटही नाही
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 10:35 AM

गुवाहाटी : शेळीच्या पोटी चक्क मानवी बाळासारख्या दिसणाऱ्या पिल्लाने जन्म घेतला. आसाममधील कछार जिल्ह्यातील धौलाई विधानसभा क्षेत्रातील गंगा नगर गावात ही आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. एका पाळीव शेळीने माणसा सारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला. या पिल्लाचे दोन पाय आणि कान सोडले, तर बाकीचे शरीर मानवसदृश्य होते. मात्र जन्मानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पिल्लाचा मृत्यू झाला.

प्राण्यांच्या पोटी चित्रविचित्र दिसणाऱ्या पिल्लांचे फोटो आपण आतापर्यंत पाहिले आहेत. मात्र थेट माणसाच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेलं पिल्लू आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चेहरा लहान मुलासारखा

शेळी मालकाने सांगितले, की सोमवारी त्याच्या शेळीने मानवी शरीराप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला. हे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याचा संपूर्ण चेहरा लहान मुलासारखा होता आणि मुलाला शेपूटही नव्हते. हे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर गावातील नागरिकांनी पिल्लाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Assam Goat Human Baby

शेळीच्या पोटी माणसासारखे दिसणारे पिल्लू

काही तासातच मृत्यू

शेळीने एका अविकसित जीवाला जन्म दिल्याचे फोटोमध्ये दिसून येते. तिचा चेहरा माणसांसारखाच दिसतो. काळ्या शेळीच्या पोटातून तपकिरी रंगाचे पिल्लू जन्माला आल्यानंतर आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी शेळीच्या पोटी जन्म घेतला असावा, अशी गावकऱ्यांनी समजूत केली होती. मात्र, हे पिल्लू जास्त काळ तग धरु शकले नाही. यानंतर गावकऱ्यांनी पारंपारिक रितीरिवाजानुसार त्याचे दफन केले.

संबंधित बातम्या :

जवळपास 14 महिन्यानंतर आपल्या केअरटेकरला भेटले हत्ती, या प्रकारे झालं स्वागत, पाहा व्हिडीओ

महिलेच्या पोटात 35 वर्षापासून भ्रूण! 2 किलो वजनाचा स्टोन बेबी पाहून डॉक्टर्सही हैराण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.