माणसचं नाही, प्राणी सुद्धा जीवन संपवतात, बकरीचा शॉकिंग VIDEO
बकरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जालं. तणावाखाली येऊन फक्त माणसच नाही, प्राणी सुद्धा आपलं जीवन संपवतात, हे तुम्हाला समजेल.
जर तुम्हाला असं वाटतं की, फक्त माणूसच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो, तर तुम्ही चुकीचे आहात. माणसच नाही, तर प्राणी सुद्धा तणावाखाली असताना आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. वैज्ञानिकांच्या रिसर्चमधून ही बाब समोर आलीय. प्राण्यांच्या आयुष्यातही असे काही प्रसंग येतात, जेव्हा त्यांना नाईलाजाने आत्महत्येसारख पाऊल उचलावं लागतं. सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर लोकांच लक्ष वेधून घेतोय. त्यात एक बकरी जळत्या चिमणीत जाणुनबुजून उडी मारताना दिसतेय. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून रक्षणासाठी घरच्यांनी चिमणी पेटवली आहे. खोलीत पाळलेली बकरी आहे, जी अचानक जळत्या चिमणीत उडी मारते. त्यावेळी घरातील एक सदस्य त्या बकरीचे पाय खेचून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण बकरी ऐकत नाही. पुन्हा एकदा जळत्या चिमणीकडे जाते. जणू आज जीवन संपवायचच, असच त्या बकरीने ठरवलेलं दिसतय.
किती कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला?
बकरीला पाहून कोकरु सुद्धा त्या जळत्या चिमणीमध्ये उडी मारण्यासाठी पळतं, त्यावेळी मुलगा कसंबसं त्याला बाहेर काढतो. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे. @RestrictedReels हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. 4 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा पाहिलाय. अनेकांनी ही भयानक क्लिप असल्याच म्हटलं आहे. काही युजर्सनी म्हटलय की, बकऱ्या आगीला घाबरत नाहीत. एका यूजरने लिहिलय की, कोणी सांगेल का? हे काय चाललय.
— R_Reels🔞 (@RestrictedReels) January 5, 2025
मी आताच बकरीला आणि तिच्या बछड्याला आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिलं. दुसरा युजर लिहितो बकरीची कृती चक्रावून सोडणारी आहे. याआधी बकरीला काय भोगावं लागलय त्याची कल्पना नाही.