बकरी जशी देवासमोर जाते, नमस्कार करते! चमत्कार म्हणायचा का हा?

भाविक मंदिरासमोर हात जोडून उभे राहून प्रभूच्या आरतीत सहभागी होत आहेत.

बकरी जशी देवासमोर जाते, नमस्कार करते! चमत्कार म्हणायचा का हा?
Goat prayingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 2:53 PM

सोशल मीडियावर अनेक कंटेंट पाहायला मिळतात ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाहीत. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील एका मंदिरासमोर एक बकरी गुडघे टेकून नमस्कार करताना दिसतीये. हा व्हिडिओ डेव्हिड जॉन्सन नावाच्या युझरने रविवारी ट्विटरवर शेअर केलाय.

जॉन्सन यांनी ट्विट करताना कॅप्शनमध्ये कानपूर जिल्ह्यातील बाबा आनंदेश्वर यांच्या मंदिरात ही क्लिप एका भक्ताने काढल्याचं सांगितलंय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता, भाविक मंदिरासमोर हात जोडून उभे राहून प्रभूच्या आरतीत सहभागी होत आहेत.

त्याच ठिकाणी एक काळ्या रंगाची बकरी गुडघ्यांवर बसून डोकं टेकवत आहे. बकरी शांतपणे प्रार्थना करतीये.इतक्या भक्तिभावाने ती शांतपणे पाया पडतीये की बघणारे बघतच राहतील.

ही पोस्ट शेअर करताना जॉन्सन यांनी लिहिले की, “कानपूरच्या परमार्थ मंदिरातून विश्वासाचे एक अद्भुत चित्र समोर आले आहे, जिथे बाबा आनंदेश्वर यांच्या आरती वेळी एक बकरी अत्यंत भक्तिभावाने गुडघे टेकताना दिसलीये.”

पाहा व्हिडिओ-

डेव्हिड जॉन्सन यांनी पुढे लिहिले आहे की, ‘गर्भगृहाबाहेर भक्तांसह शिवलिंगासमोर नतमस्तक झालेली ही बकरी चर्चेचा विषय राहिलीये.”

बाबा आनंदेश्वर मंदिर शंकराला वाहिलेलं गंगा नदीच्या तीरावरील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना.
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा.
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले.
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?.
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?.
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा...
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा....
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम.
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता.
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'.