‘प्लास्टिक दो, सोना लो’, प्लास्टिकमुक्त करण्यासाठी भारतातल्याच एका गावाची अनोखी मोहीम!
तर या गावचे सरपंच म्हणतात की, प्लास्टिकच्या बदल्यात सोनं देण्याचा नारा मी माझ्या गावात सुरू केला, जो यशस्वी झाला. नदी-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. इतर प्रसारमाध्यमांनी आणखी काही गावांची चर्चा केली आहे.
श्रीनगर: भारत हा गावांचा देश आहे, असे म्हटले जाते. इथली गावे स्वच्छ झाली तर देशाचे चित्र बदलेल. मात्र, अशी अनेक गावे आहेत जिथे काही मोठे काम केले जात आहे. यापैकी एक गाव जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे, जिथे लोक प्लास्टिकमुक्त पृथ्वीचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे गाव रोज चर्चेचा विषय ठरतंय. 20 क्विंटल प्लास्टिक कचऱ्यावर इथे एक सोन्याचे नाणे मिळते. हे गाव सध्या प्लास्टिकमुक्त झाले आहे.
हे गाव दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे. त्याचे नाव सादिवरा असे आहे. गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांना गाव प्लास्टिक प्रदूषणमुक्त करायचे आहे, व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना फारसे यश आले नाही. शेवटी त्यांनी अशी एक घोषणा केली ज्यामुळे लोकांची गर्दीच गर्दी झाली. या घोषणेने इथला प्लास्टिक कचरा संपला होता.
सरपंचांनी ‘प्लास्टिक दो आणि सोना लो’ नावाची मोहीम सुरू केल्याचे बोलले जाते. या योजनेअंतर्गत जर कोणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिला तर पंचायत त्याला सोन्याचे नाणे देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर 15 दिवसांतच संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आले. आजूबाजूच्या इतर अनेक पंचायतींनीही तो स्वीकारल्याचा उल्लेख अनेक अहवालात आहे.
तर या गावचे सरपंच म्हणतात की, प्लास्टिकच्या बदल्यात सोनं देण्याचा नारा मी माझ्या गावात सुरू केला, जो यशस्वी झाला. नदी-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. इतर प्रसारमाध्यमांनी आणखी काही गावांची चर्चा केली आहे, जिथे प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला आहे. यातील एक उपाय म्हणजे सोने देणे. त्यात बऱ्यापैकी यशही आले आहे.