अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा
gold plated Vada Pav | हा जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव असल्याचा दावा हॉटेलने केला आहे. यामध्ये वड्याला 22 कॅरेटच्या सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. वडा तयार करण्यासाठी ट्रफल बटर आणि चीज स्टफिंग वापरण्यात आले आहे.
मुंबई: वडापाव हा मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, ही बाब सर्वश्रुत आहे. एकदाही वडापाव खाल्ला नाही, अशी व्यक्ती मुंबईत सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण वडापाव हा मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि नाक्यावर मिळतो. वडापावची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे हा खाद्यप्रकार सामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, हाच वडापाव 2000 रुपयांना मिळत असेल तर. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. (World’s First Gold plated Vada Pav introduced in UAE hotel)
सध्या सोशल मीडियावर सोन्याचा वर्ख असलेल्या वडापावची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. हा वडापाव संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) O,Pao नावाच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये आहे. या वडापावची किंमत 99 दिरहम म्हणजे तब्बल 2000 रुपये इतकी आहे. हा जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव असल्याचा दावा हॉटेलने केला आहे. यामध्ये वड्याला 22 कॅरेटच्या सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. वडा तयार करण्यासाठी ट्रफल बटर आणि चीज स्टफिंग वापरण्यात आले आहे.
View this post on Instagram
व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. opaodxb या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.
वडापावची किंमत ऐकून नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
या गोल्ड प्लेटेड वडापावची किंमत ऐकून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दहा ते बारा रुपयांना विकल्या जाणाऱ्या वडापावची किंमत थेट 2000 रुपयांवर नेणे ही बाब अनेकांच्या पचनी पडलेली नाही.
Cries in 12 Rs. wala vada pav + no free mirchi also https://t.co/HTXYEInOVR
— Cycle Chain Shankar (@dakuwithchaku) August 31, 2021
Mom I’m scared they’re wrapping vada pav in gold https://t.co/6oQ1emAQyY
— ईशा (she/they) (@Agabaai) August 30, 2021
#Gold_Vada_Paav This is what’s wrong with the world: too many rebels without a cause. pic.twitter.com/JKeKsgOLEo
— Masarat Daud (@masarat) August 30, 2021
इतर बातम्या:
Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल
VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा
तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
(World’s First Gold plated Vada Pav introduced in UAE hotel)