सरकारी शाळेचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हाला ‘ही’ शाळा नक्की आवडेल!
सरकारी शाळा म्हटलं की लोकांचे याबाबत अनेक संभ्रम असतात. असा एखादा सरकारी शाळेचा शिक्षक असू शकतो का ज्याचे इंस्टाग्रामवर खूप फॅन्स असू शकतात? आपण याचा विचार स्वप्नात देखील करू शकत नाही. पण एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याने तुमचे अनेक गैरसमज दूर होतील.
मुंबई: सरकारी शाळा आणि सरकारी शाळेचे शिक्षक म्हणलं की लोकांना वाटतं शिक्षक काहीच करत नाही. सरकारी शाळा आणि तिथले शिक्षक याबाबत लोकांचे काही संभ्रम असतात. तिथे काम होतं, किती शिकवलं जातं काय कसं होतं हे सगळं लोकच ठरवतात. जिल्हा परिषदचे शिक्षक सुद्धा आपल्याला पँट शर्ट घातलेले, साधासुधा माणूस वाटतो. हा व्हिडीओ बघून तुमचे संभ्रम दूर होतील. खरंच सरकारी शाळा आपल्याला वाटते तशीच असते का? खरंच सरकारी शाळांच्या शिक्षकांना काम नसतं का? त्यांचं दिवसाचं काही रुटीन नसतं का? हा व्हायरल व्हिडीओ बघा, हे बघून तुमचे अनेक संभ्रम दूर होतील.
दिवसाचं रुटीन यात सांगितलं…
हा व्हिडीओ दिल्लीच्या सरकारी शाळेचा आहे. व्हिडीओ इथल्या एका शिक्षकाने बनवलाय. व्हिडीओ बघून हा शिक्षक एखाद्या सरकारी शाळेचा शिक्षक असेल असं वाटतंच नाही. हा एखादा मॉडेल आहे असं वाटतं. या शिक्षकाने या व्हिडीओमध्ये सरकारी शाळेच्या शिक्षकांना किती काम असतं हे सांगतोय. त्याने दिवसाचं रुटीन यात सांगितलं आहे. सकाळी उठून तो काय करतो, मग शाळेत येऊन हजेरी कशी लावतो, मग विद्यार्थ्यांचे वाढदिवस कसे साजरे करतो, सगळ्या समस्या कशा सोडवतो हे सगळं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
View this post on Instagram
विद्यार्थी सुद्धा चेहऱ्यावर हास्य घेऊन घरी परतात
या व्हिडीओमध्ये सरकारी शाळेचं एकूण कामकाज तुम्हाला दिसून येईल आणि सगळे संभ्रम दूर होतील. सरकारी शाळा खरंच इतक्या चांगल्या असू शकतात का? त्या इंग्लिश मीडियमच्या तोडीच्या असू शकतात का? तुम्हाला हे बघून प्रश्न पडतील. या शिक्षकाचे इंस्टाग्रामवर अनेक फॉलोवर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहे, त्याचे 50 हजारापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. हा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतोय दिसतोय तेव्हा तो एकदम हटके पद्धतीने शिकवतोय. खूप काम करून शिक्षकाचा शाळेचा दिवस संपतो, विद्यार्थी सुद्धा चेहऱ्यावर हास्य घेऊन घरी परतात.