Monkey Video Viral : इतका लोभी, की हातातलं सगळं गमावून बसतं ‘हे’ माकड

सोशल मीडिया(Social Media)वर माकडां(Monkey)शी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. तुम्ही लहानपणी लोभी माकडाची गोष्ट ऐकली असेल, पण तुम्ही क्वचितच कधी माकडाचा लोभीपणा पाहिला असेल, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हेही समजेल की माकडांमध्येही लोभीपणा असतो.

Monkey Video Viral : इतका लोभी, की हातातलं सगळं गमावून बसतं 'हे' माकड
लोभी माकड
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 6:07 PM

Monkey funny viral video : सोशल मीडिया(Social Media)वर माकडां(Monkey)शी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. त्यांचे काही व्हिडिओ इतके क्यूट आहेत की ते पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात. त्याचबरोबर काही व्हिडिओ मजेशीर (Funny) असतात, तर काही लोकांना पाहून धक्काच बसतो, तर यातील अनेक प्राणीही आपल्याला असे काही धडे देतात, जे पाहून तुम्हालाही जीवनातील एक मोठा धडा मिळेल आणि अति लोभाचे परिणाम वाईट असे का म्हणतात, ते ही कळेल. अनेकदा तुम्ही लहानपणी लोभी माकडाची गोष्ट ऐकली असेल, पण तुम्ही क्वचितच कधी माकडाचा लोभीपणा पाहिला असेल, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हेही समजेल की माकडांमध्येही लोभीपणा असतो. त्यामुळे त्याला उपाशी राहण्याचीही वेळ येते.

सर्व पाव घेतो

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक माकड पाव खात आहे आणि त्याच्या जवळची व्यक्ती त्याला एकामागून एक पाव देत आहे. माकड सुद्धा आपल्या हातातील पंजा समोर करून त्या व्यक्तीच्या हातून पाव घेत आहे. माकडाचे हात पूर्ण भरलेले असतात, पण तरीही त्याचा लोभ संपत नाही आणि तो सुद्धा अनेक पाव आपल्या हातात ठेवायला लागतो. इतर कोणी घेऊ नये म्हणून सर्व पाव सोबत घ्यावे, असे त्याला वाटते. इतकंच नाही तर ती व्यक्ती त्याला केळीही देते आणि ती सगळी केळी घेतो, या प्रकरणामध्ये माकडाच्या हातातून पाव आणि केळीही खाली पडतात. पण माकडाचा लोभ काही संपत नाही. माकडाच्या अशा कृतीमुळे त्याला नीट जेवता येत नाही आणि त्याचे पावही पडतात.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलंय, की ‘लालच और और पाने के लालच में, जो उसके पास है उस आनंद से भी जाता है. हा व्हिडिओ लिहिपर्यंत या व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

‘लोभ वाईट आहे’

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलं, की या क्लिपनं जीवनाचा एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे. दुसऱ्या यूझरनं लिहिलं, की लोभ वाईट आहे असं का म्हटलं जातं, हे मला आज समजलं. याशिवाय इतर अनेक यूझर्सनीही यावर कमेंट केल्या आहेत.

खतरनाक बदला..! पैसे मागितले म्हणून तरुणाचा तिघांनी ‘असा’ घेतला सूड, Funny Video Viral

Viral : गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video

Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय ‘ही’ तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.