Photo Viral : गाजराचा हलवा खाल्ला असेल, आता ‘हा’ भन्नाट हलवा खायला सज्ज व्हा!
एक फोटो (Photo) सध्या व्हायरल झालाय. गाजरा(Carrot)चा हलवा तुम्ही ऐकला नाही तर अनेकवेळा खाल्लाही असेल. पण हिरव्या मिरची(Green chillies)चा हलवा खाल्लाय का? नक्कीच नाही. आम्ही तुम्हाला असा फोटो आज दाखवणार आहोत, जो पाहून तुमच्या तोंडाला नाही त्यातल्या तिखटामुळे डोळ्यांतूनही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Green Chili Pudding : सोशल मीडियावर कोणते व्हिडिओ तयार होतील आणि व्हायरल होतील हे कुणीही सांगू शकत नाही. असे काही व्हिडिओ किंवा फोटो असतात की आपल्याला विचार करायला भाग पाडतात. खाद्यपदार्थांचे व्हिडिओ किंवा फोटोही अशाच प्रकारामध्ये येतात. असे व्हिडिओ किंवा फोटो यूझर्सकडून पाहिले जातात. मात्र कधीकधी काहीतरी वेगळंच या व्हिडिओ किंवा फोटोमध्ये असतं, मग आपल्याला आश्चर्य वाटतं की हे असंही असू शकतं. खाद्य पदार्थांवर विचित्र असे प्रयोग तुम्ही पाहिले असतीलच. आता असाच एक फोटो (Photo) सध्या व्हायरल झालाय. गाजरा(Carrot)चा हलवा तुम्ही ऐकला नाही तर अनेकवेळा खाल्लाही असेल. पण हिरव्या मिरची(Green chillies)चा हलवा खाल्लाय का? नक्कीच नाही. आम्ही तुम्हाला असा फोटो आज दाखवणार आहोत, जो पाहून तुमच्या तोंडाला नाही त्यातल्या तिखटामुळे डोळ्यांतूनही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Sardi ke liye Hari mirch ka halwa pic.twitter.com/dcIPJEITdB
— Rana Safvi رعنا राना (@iamrana) January 27, 2022
कोण खाईल?
कोणी मॅगीचे विचित्र प्रयोग करण्यात व्यस्त आहे, तर कोणी चहामध्ये रूह अफजा किंवा बटर टाकत असल्याचे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. हलव्याबद्दल बोलायचं झालं तर हा गोड पदार्थ म्हणून सगळ्यांनाच आवडतो, पण सध्या इंटरनेटवर जो हलवा व्हायरल होत आहे, तो क्वचितच कुणाला खायला आवडेल. ही डिश पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये विचित्र कमेंट्स येत आहेत. कुणी विचारतंय याची काय गरज होती? तर काहींनी हलव्यावर होणारे अत्याचार थांबवा असं म्हटलंय.
Somebody kill me please! I think i had enough diet for my life!?⛏️✂️⛏️??️
— Sahil (@walknote_) January 27, 2022
Why? Oh God, Halwa of chillies?
— chintel (@saraf1997_) January 27, 2022
Mirchi ka halwa kon khata hai bhai !!
— Sohail سوحیل सोहेल (@sohailraza92) January 27, 2022
थंडीसाठी खास!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर एक चित्र वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हिरवी मिरचीची खीर दिसत आहे. ही पोस्ट Rana Safvi رعنا राना यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केली आहे. फोटो शेअर करताना पेजच्या अॅडमिननं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की Sardi ke liye Hari mirch ka halwa. या पोस्टवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.