घ्या आता! स्वतःच्याच लग्नात यायचं विसरला, कारण वाचून विचारात पडाल
स्वतःच्या लग्नात जायला, हजेरी लावायला कुणी विसरू शकतं का? हा म्हणजे हलगर्जीपणाचा कळस झाला म्हणायचा. कारण जर वाचलंत तर थक्कच व्हाल. आता लग्नात हजेरी लावायचा विसरला म्हणजे त्याचं कारणंही तसंच असणार नाही का?
व्यक्तीसाठी लग्न हा सर्वात महत्वाचा दिवस असतो. मात्र, बिहारमधील भागलपूरमधील सुलतानगंज गावातील एका व्यक्तीने हा दिवस संस्मरणीय करण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला. लग्नातले अनेक अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, वाचले असतील पण हा किस्सा एकदम हटके आहे. स्वतःच्या लग्नात कुणी असं करू शकतं का? स्वतःच्या लग्नात जायला, हजेरी लावायला कुणी विसरू शकतं का? हा म्हणजे हलगर्जीपणाचा कळस झाला म्हणायचा. कारण जर वाचलंत तर थक्कच व्हाल. आता लग्नात हजेरी लावायचा विसरला म्हणजे त्याचं कारणंही तसंच असणार नाही का? अहो नवरदेव दारूच्या नशेत असल्यामुळे चक्क स्वतःच्या लग्नात जायला विसरलाय मंडळी!
लग्नाआधी नवरदेव आणि त्याचे मित्र मद्यधुंद झाले होते. यामुळे नवरदेव लग्नाला येणे विसरला. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव या मोठ्या दिवसाबद्दल इतका उत्साहित होता की तो आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि दारूच्या नशेत बुडाला. लग्नाच्या दिवशी नवरदेव जल्लोषाच्या मूडमध्ये असला तरी त्याने पार्टीसाठी नक्कीच चुकीचा दिवस निवडलाय असं म्हणायला हरकत नाही.
दारूच्या नशेमुळे नवरा लग्नाला यायला विसरला
अतिमद्यपानामुळे हा व्यक्ती स्वत:च्या लग्नाला उपस्थित राहणे विसरला. लग्नाच्या ठिकाणी वधू आणि तिचे कुटुंबीय त्याची वाट पाहत होते पण तो आला नाही. नवरा भानावर येताच तो वधूच्या घरी पोहोचला, पण निराश होऊन वधूने लग्नास नकार दिला. आपल्या जबाबदाऱ्या न समजणाऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवता येणार नाही असा तिचा निर्णय होता. लग्नाच्या आयोजनासाठी खर्च झालेले पैसे नवरदेवाच्या कुटुंबीयांनी द्यावेत, अशी मागणीही तिच्या कुटुंबीयांनी केली.
लग्नाच्या पैशाची वाट पाहत वधूच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या कुटुंबातील काही सदस्यांना बंदी बनवून ठेवल्याने लग्न रद्द होण्याच्या घटनेला अत्यंत वाईट वळण लागलं. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि परिस्थिती नियंत्रणात आली. जेव्हा आजूबाजूच्या लोकांना ही बाब कळली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. लग्नाआधी नवरदेवाची ही अवस्था पाहून वधूने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्यात तिला तिच्या घरच्यांनीही साथ दिली.