जसं नवरदेवाने मित्राला पाहिलं, मिठी मारून खूप रडला!
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, नवरदेव आपल्या एका मित्राला मिठी मारतो.
या साऱ्या जगात मैत्रीपेक्षा मोठे नाते नाही, असे म्हटले जाते. हे रक्ताचे नाते नसेलही, पण ते हृदयाचे नाते नक्कीच आहे. मित्रांशी बोलल्याने मनाला मोठा दिलासा मिळतो. या नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे सर्व सुख-दु:ख तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता. सध्या सोशल मीडियावर मैत्रीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच भावनिक आहे.
खरंतर या व्हिडीओमध्ये दोन मित्र एकमेकांना मिठी मारून खूप भावूक होतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, नवरदेव आपल्या एका मित्राला मिठी मारतो, जणू काही तो बऱ्याच वर्षानंतर भेटत आहे.
नवरदेव खूप भावुक होतो, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याचवेळी जवळच उभी असलेली एक महिलाही हे दृश्य पाहून भावूक होते. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्नही ती करते.
शेवटी नवरदेव आणि त्याचा मित्रमिठी मारून झाल्यावर पुन्हा त्या स्त्रीला मिठी मारतात. लग्नासारख्या या आनंदाच्या क्षणीही नवरदेवाचे अश्रू आपल्या मित्राला बघून थांबत नाहीत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की ‘व्वा, मैत्री असावी तर अशी’. हा अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही मैत्री आम्ही कधीही तोडणार नाही’.
ये दोस्ती हम नहीं कभी नहीं तोडेंगे ?❤️ pic.twitter.com/GsZMCJGSsT
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 9, 2022
55 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजाराहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक केला आहे.
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने ‘चांगले मित्र असे असतात’ असे लिहिले.