VIDEO : सावधान…लग्नामध्ये आतिषबाजी करत आहात? मग हा गुजरातमधील नवरदेवाच्या घोडागाडीला आग लागलेला व्हिडीओ नक्की पाहा!
सोशल मीडिया म्हटंल की, कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये लग्नातील गंमती जंमतीचे व्हिडीओ व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होतात.
मुंबई : सोशल मीडिया (Social media) म्हटंल की, कधी काय व्हायरल होईल हे सांगताच येत नाही. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये लग्नातील गंमती जंमतीचे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होतात. अशाच एक लग्नातील भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओ नेमके असे काय आहे, हे आपण बघणार आहोत.
नवरदेवाच्या घोडागाडीला आग
सध्या लग्नाचा हंगाम जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आलिशान लग्नाचा ट्रेड सुरू झाला आहे. झगमगाट करून नवरदेवाची वरात घेऊन जाण्याचा ट्रेड सुरू आहे. त्यामध्ये आतिषबाजी सुरू असते. मात्र, या आतिषबाजीचा अतिरेक केल्यामुळे आनंदामध्ये अचानक कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. असाच एक गुजरातमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात नवरदेव वरात घेऊन जात असताना नवरदेव बसलेल्या घोडागाडीला आग लागली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ही आग लागली होती. विशेष म्हणजे नवरदेवासोबतच या घोडागाडीमध्ये काही लहान मुले देखील बसलेले होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत आणि काही वेळेतच आग आटोक्यात आणली गेली. आलिशान लग्नाचा ट्रेड जरी सुरू असेल तरी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
संबंधित बातम्या :
Video: मुंबई पोलिसांचं दर्यादिली पाहून नेटकरी भारावले, म्हणाले, मुंबई पोलीस बेस्ट आहेत!
Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!