Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गुलाबजाम घेऊन नवरदेव नवरीकडे आला, पण नथ आडवी आली, पुढे काय झालं ?

या व्हिडीओमध्ये जेवणादरम्यान नवरी आणि नवरदेव यांच्यात उडालेली धम्माल दाखवण्यात आली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत.

Video | गुलाबजाम घेऊन नवरदेव नवरीकडे आला, पण नथ आडवी आली, पुढे काय झालं ?
bride and groom video
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 5:21 PM

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंमध्ये नवरी आणि नवरदेव यांच्यात घडलेले मजेदार किस्से दाखवलेले असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये जेवणादरम्यान नवरी आणि नवरदेव यांच्यात उडालेली धम्माल दाखवण्यात आली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत. (groom trying to feed gulabjaam to bride video went viral on social media)

नवरदेव नवरीला खाण्यासाठी गुलाबजाम देत आहे

सोशल मीडियामध्ये नवरी आणि नवरदेवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक नवरी आणि नवरदेव दिसत आहेत. जेवणादरम्यान या दोघांमध्ये चांगलीच धम्माल उडाली आहे. व्हिडीओमध्ये लग्न समारंभ नुकताच पार पडल्याचे दिसत आहे. लग्न झाल्यामुळे नवरी आणि नवरदेव जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले आहेत. त्यानंतर नवरदेव नवरीला खाण्यासाठी एक गुलाबजाम देतो आहे.

गुलाबजाम खाताना नथ आडवी येत आहे

मात्र, नवरीच्या नाकातील नथ त्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. नवरदेव नवरीकडे गुलाबजाम घेऊन आला आहे. मात्र याच वेळी नथ आडवी आल्यामुळे नवरदेवाला गुलाबजाम भरवता येत नाहीये. नवरीला गुलाबजाम भरवण्यासाठी नवरदेव इकडे तिकडे हात करतो आहे. मात्र, नवरीला गुलाबजाम खायला देणे त्याला शक्य होत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करुन तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला लोक मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच व्हिडीओ शेअर करुन त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | आली लहर केला कहर, पोहण्याची हौस भागवण्यासाठी घरासमोर उभारला स्विमिंग पूल, जुगाड एकदा पाहाच

Video | एकाच वेळी दोन उंदीर गिळण्याचा प्रयत्न, दुतोंडी सापाचा दुर्मिळ व्हिडीओ एकदा पाहाच !

Video | तरुणीला वाटलं तो शाहरुखसारखा धावत येईल, तिने प्रियकराकडे पाठ केली अन् घोळ झाला, व्हिडीओ पाहाच !

(groom trying to feed gulabjaam to bride video went viral on social media)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.