लग्नाचे विधी सुरु असताना नवरदेवासोबत दुर्घटना, धक्कादायक व्हिडीओ!
लग्नाची मिरवणूक असो किंवा वधूला घेऊन घरी जाईपर्यंत सर्व काही सुरळीत व्हावे अशी प्रत्येकाच्याच घरच्यांची इच्छा असते कारण काहीही अडचणी आल्या तरी शुभकार्याचं वातावरण बिघडतं. इथे सर्व नातेवाईक लग्नसमारंभात गुंतले होते, पण याच दरम्यान...

मुंबई: इंटरनेटच्या दुनियेत असे व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतात ज्यांना पाहून आपल्याला हसावं की रडावं हेच कळत नाही. हे पाहिल्यानंतर आपण स्तब्ध होतो कारण असे दृश्य आपण यापूर्वी क्वचितच पाहिलेले असते. हे व्हिडीओ आपण पाहतोच पण लोकांसोबत शेअर सुद्धा करतो. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. लग्नाची मिरवणूक असो किंवा वधूला घेऊन घरी जाईपर्यंत सर्व काही सुरळीत व्हावे अशी प्रत्येकाच्याच घरच्यांची इच्छा असते कारण काहीही अडचणी आल्या तरी शुभकार्याचं वातावरण बिघडतं. इथे सर्व नातेवाईक लग्नसमारंभात गुंतले होते, पण याच दरम्यान एक भिंत कोसळली आणि चारही बाजूंनी ओरडण्याचा आवाज येऊ लागला. हा अतिशय धक्कादायक व्हिडीओ आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका गावातील असल्याचे दिसत आहे. जिथे नवरदेव आपल्या लग्नाची मिरवणूक घेऊन आला. लग्नाचे वेगवेगळे विधी पार पाडले जात असून गावकऱ्यांनी आजूबाजूला गर्दी करून उभे आहेत. मध्ये नवरदेव उभा आहे. नवदेवासमोर एक भिंतही दिसत आहे ज्यावर लोक उभे राहून व्हिडिओ बनवत आहेत. यावेळी एक मुलगा वर भिंतीवर ठेवलेल्या दगडावर फोन ठेवून व्हिडिओ बनवत असतो आणि तो थोडा पुढे जाताच भिंतीचा समतोल बिघडतो आणि भिंत खाली उभ्या असलेल्या नवरदेवावर पडते. पुढे काय होतं ते तुम्हीच बघा.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही बातमी लिहिताना 87 लाखांहून अधिक लोक लाइक आणि कमेंट करून आपला अभिप्राय देत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ आश्चर्यकारक वाटला, तर अनेक युजर्स याचा आनंद घेताना दिसत आहेत.