भावाने जिम मध्येच केक कापला, कसा कापला ते तर बघा! व्हिडीओ व्हायरल
मित्र जर जिम प्रेमी असेल तर तुम्ही हा व्हिडीओ नक्की बघा. त्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा याची आयडिया तुम्हाला मिळेल. सध्या जिमला जाणं, बॉडी बनवणं म्हणजे ट्रेंड आहे. लोकं जिमची मेंबरशिप घ्यायला कधीच विसरत नाहीत. सतत व्यायाम करणाऱ्या लोकांचा वाढदिवस साजरा करायचा तरी कसा...हा असा!
मुंबई: बॉडी बनवायचं वेड कुणाला नाही? आजकाल मुलं ज्युनिअर कॉलेजला गेली रे गेली की लगेच जिमची मेंबरशिप घेतात. कितीही पैसे लागो, बॉडी बनली पाहिजे. मुलं सुद्धा दिवसातला बराच वेळ या जिम मध्ये घालवतात, छान आवडीने व्यायाम करतात. आता हे जिमला जाणे म्हणजे एक फॅड झालंय. आपण सुद्धा जिम मधले अनेक व्हायरल व्हिडीओ बघतो. कधी मोटिव्हेशनल असतात, कधी मस्करीत बनवलेले असतात, कधी व्यायाम करताना बनवलेले असतात. मुलंच काय मुलीसुद्धा जिमला जातात आणि एक रुटीन फॉलो करतात. एकवेळ कॉलेज, ऑफिसला दांडी मारतील पण जिमला मारणार नाहीत अशातलं हे वेड! असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो जिम मधला आहे.
व्हिडीओ मध्ये तुम्हाला हिंट
समजा तुमच्या मित्राला व्यायाम करायला फार आवडतो आणि तो जिमला जातो. तो अजिबात जिम बुडवत नाही, काहीही असो. अशा मित्राला तुम्ही काय गिफ्ट द्याल? त्याचा वाढदिवस कसा साजरा कराल? या व्हिडीओ मध्ये तुम्हाला हिंट मिळेल. या व्हिडीओमधला मुलगा बहुधा जिम फ्रिक असावा. जिम फ्रिक म्हणजे जिम लव्हर, जिम प्रेमी! कारण ज्या पद्धतीने याने जिम मध्ये आपल्या वाढदिवसाचा केक कापलाय त्यावरून लक्षात येतं की त्याचं जिम वर किती प्रेम आहे.
When u skip Brain day pic.twitter.com/cjj53GYaIf
— Prithvi (@Puneite_) August 30, 2023
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हा व्हिडीओ बघा, या व्हिडीओमध्ये काही मुलं आपल्या मित्राच्या बर्थडेसाठी जिम मध्येच केक घेऊन येतात. ही सगळी मुले जिमफ्रिक आहेत की काय असा बघूनच प्रश्न पडतो. व्हिडीओ मधल्या सगळ्यांची बॉडी चांगली आहे, असं वाटतं हे बॉडी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतात. ज्याचा वाढदिवस असतो तो बेंच प्रेसच्या मशीन जवळ जातो तिथे आडवा होतो. त्याच्या छातीवर त्याचे मित्र केक ठेवतात आणि बर्थडे बॉय केक कापतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.