चमच्याने केस कापले! लोक म्हणाले, “टॅलेंट है भाई”! होय, बघा व्हिडीओ
तुम्ही हेअरकटसाठी सलूनमध्ये गेला असाल, जिथे केस कापण्यासाठी अनेकदा कात्री आणि रेझर वापरताना दिसतात, पण तुम्ही कधी कुणाला चमच्याने केस कापताना पाहिलं आहे का?
या जगात काही कमी प्रतिभावान लोक नाहीत. असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने जगाला आश्चर्यचकित करतात. काही जण त्यांची प्रतिभा पाहून हा चमत्कार मानतात. आता जादूगारांकडे बघा. कधी कधी ते अशी जादू दाखवतात की लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. मात्र, प्रत्यक्षात त्याची प्रतिभाच सर्वांना चकीत करणारी आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या मुलाचे केस कापताना दिसत आहे, पण विशेष म्हणजे तो केस कापण्यासाठी रेझर ऐवजी चमचा वापरत आहे. ही त्याची प्रतिभा आहे.
तुम्ही हेअरकटसाठी सलूनमध्ये गेला असाल, जिथे केस कापण्यासाठी अनेकदा कात्री आणि रेझर वापरताना दिसतात, पण तुम्ही कधी कुणाला चमच्याने केस कापताना पाहिलं आहे का? तुम्ही पाहिलं नसेल, पण या व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे, ज्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा केस कापण्यासाठी खुर्चीवर बसला आहे आणि त्याचे वडील चमच्याने केस कापत आहेत. रेझरसारख्या चमच्याने त्याचे वडील केस अगदी सहज कापतात आणि डिझाईनही बनवतात. मुलाचे केस पाहून ते चमच्याने कापले आहेत असे वाटणार नाही.
या व्यक्तीचा हा अनोखा टॅलेंटेड व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ari_rover नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
View this post on Instagram
कुणी ‘हा चमचा वाइब्रेनियमचा बनलेला आहे’, तर कुणी ‘चमच्यामागे लपवलेला ब्लेड दाखवा’ असं म्हणत आहे, तर कुणी ‘हा टॅलेंट आहे’, असं लिहिलं आहे. तर काही युजर्स याला अप्रतिम एडिटिंग म्हणत आहेत. खरं तर मुलाचे केस चमच्याने कापलेले नाहीत, पण ते चमच्याने कापले जात आहेत असे वाटते अशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे.