मुंबई : सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib)नं मागितली माफी मागितलीय. हेअर स्टाइल सेमिनारच्या दरम्यान महिलेच्या केसात थुंकल्याप्रकरणी त्यानं माफी मागितलीय. सेमिनार सुरू असताना महिलेची हेअर स्टाइल करताना तो केसात थुंकला. महिलेनं याबाबत आक्षेप घेत व्हिडिओ केला. तो व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितलीय.
काय होतं प्रकरण?
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झाला होता. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला. जावेद हबीबनं थुंकून (Spitting) केस कापल्याचा आरोप महिलेनं केलाय.
मुजफ्फरनगरमधला प्रकार
हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा होता. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी बोलावतो. केस कापताना तो म्हणतो, ‘माझे केस घाणेरडे आहेत, का घाणेरडे आहेत, तर मी शाम्पू लावला नाही. नीट ऐका… पाण्याची कमतरता असेल तर… या थुंकीत प्राण आहे’. यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र ज्या महिलेचे केस कापले जात आहेत, ती मात्र कम्फर्टेबल नव्हती. आता या महिलेची प्रतिक्रियाही आलीय. काल व्हायरल झालेला आणि वादग्रस्त हाच तो व्हिडिओ…
UP : जावेद हबीब भी “थूक कांड” में शामिल हो गए। बता रहे हैं कि पानी नहीं है तो थूक से भी बाल बनाये जा सकते हैं। वीडियो मुजफ्फरनगर की बताई गई। pic.twitter.com/glsJlDdjYq
— Sachin Gupta (@sachingupta787) January 5, 2022
वादानंतर स्पष्टीकरण
माझे सेमिनार प्रोफेशनल स्तरावरचे असतात. ते मोठे असतात. ते अधिक इंटरेस्टिंग करण्यासाठी अशाप्रकारे काही बाबी कराव्या लागतात. मात्र त्या सेमिनारमध्ये वापरलेल्या काही शब्दांवरून काही जण दुखावले गेले. त्याबद्दल मी माफी मागतो, असं तो म्हणाला. दिल से माफी मांगता हूँ. माफ करो ना, असा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.