बाजाराच्या बरोबर मध्यातून धावणारी जगातील सर्वात अनोखी ट्रेन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण गोष्ट
असे मानले जात होते की सर्वात व्यस्त ठिकाणांच्या मधून निघणारी ही एकमेव ट्रेन आहे.
रेल्वेगाड्यांचा विचार केला तर देश आणि जगातील रेल्वे गाड्यांमध्ये खूप फरक आहे. अशा अनेक हटके रेल्वे गाड्या आहेत ज्याबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते. अशी एक रेल्वे आहे जी भाजी मंडईच्या बरोबर मधून जाते. माहितेय? म्हणजे ही ट्रेन जेव्हा इथल्या ट्रॅक वरून धावते तेव्हा ट्रॅक च्या दुतर्फा भाज्यांची दुकानं, इतर दुकानं आहेत. ही जगातली सगळ्यात गर्दीच्या ठिकाणी धावणारी रेल्वे आहे.
व्हिएतनामची राजधानी हनोई येथील एका बाजारात ही रेल्वे धावते. असे मानले जात होते की सर्वात व्यस्त ठिकाणांच्या मधून निघणारी ही एकमेव ट्रेन आहे कारण जेव्हा ही ट्रेन बाजाराच्या मध्यभागी जायची, तेव्हा कोणताही क्रॉसिंग किंवा अडथळा बसविण्यात आला नाही. त्यामुळेच ते अत्यंत धोकादायकही मानले जात होते.
अलीकडे या ट्रेनचे आणि त्या मार्केटचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असून याला एक कारणही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडे सुरक्षेच्या कारणास्तव या ट्रेनचा ट्रॅक तिथून हटवण्यात आला असून रस्ता बंद करण्यात आलाय. त्यावर बराच काळ विचार सुरू होता, हे आता शक्य झाला आहे.
माहितीनुसार,फ्रेंच वसाहतवादी राजवटीत 1902 मध्ये हा रेल्वेमार्ग टाकण्यात आला होता. मग ते शहराच्या धकाधकीपासून दूर होते. पण हनोईच्या विस्ताराने हा रेल्वेमार्ग शहराच्या मध्यावर आला. त्याच्या दोन्ही बाजूला घरे, दुकाने सजविण्यात आली आणि लोकांची ये-जाही सुरू झाली. सध्या तरी ती बंद करण्यात आली आहे.