Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने केला आजीसोबत पुष्पाच्या गाण्यावर डान्स, स्वॅग पाहून नेटकरी म्हणाले…

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक पांड्या आणि त्याची आजी 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली...' गाण्याच्या डान्स स्टेप्सची कॉपी करत आहेत. या व्हिडिओला यूजर्सची खूप पसंती मिळत आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने केला आजीसोबत पुष्पाच्या गाण्यावर डान्स, स्वॅग पाहून नेटकरी म्हणाले...
हार्दिक पांड्याचा आजीसोबत डान्स
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:14 PM

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise Movie) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. चाहत्यांना हा चित्रपट जसा आवडला आहे तसेच त्यातील गाण्यांनाही पसंती दिली जात आहे. त्याचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याच्या आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ चित्रपटातील एका गाण्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहे. हार्दिक पांड्याची क्रिकेटमध्ये जबरदस्त फॅन फोलोविंग आहे. हार्दीक पांड्याला क्रिकेट जगतात कुंफू पांड्या म्हणून ओळखले जाते. कारण तो एक जबरदस्त फिल्डर तर आहेच, मात्र कधी कधी तो महेंद्रसिंह धोनींसारखा हेलिकॉप्टर शॉटही मारतो, तर कधी सिक्सरचा पाऊस पाडतो. अशा क्रिकेटपटूने आपल्या आजीसोबत श्रीवल्ली हुक स्टेप केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या आणि त्याची आजी अल्लू अर्जुनच्या श्रीवल्लीवर सुंदर नृत्य करताना दिसतात. दोघांनीही प्रत्येक टप्प्यावर उत्तम समन्वय साधला आहे. व्हिडीओ शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले – आमच्या स्वतःच्या पुष्पा नानी. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही hardikpandya93 नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की त्यांनी तो पुन्हा पुन्हा बघितला आहे, तसेच त्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून खूप प्रेमाचा वर्षाव होत आहे.

नेटिझन्सनी या व्हिडिओवर बरेच इमोटिकॉन्स शेअर केले आहेत. एका युजरने लिहिले – खूप गोंडस… तुझ्यावर खूप प्रेम. दुसर्‍या यूजरने लिहिले – अप्रतिम डान्स, तुम्ही दोघे खूप क्यूट आहात. तिसऱ्या यूजरने लिहिले – हार्दिक, हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. दुसर्‍याने लिहिले – तुझी आजी खरोखरच गोड आहे. अशा अनेक कमेंटचा या व्हिडिओवर पाऊस पडतो आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्सही आले आहेत.

VIDEO : विकेट घेतल्यानंतर ब्रावोच्या अंगात घुसला पुष्पा, श्रीवल्लीवर नाचत बॅट्समनला म्हणाला, मै नहीं झुकेगा’

VIDEO : तरूणाने ‘गुड नाल इश्क मीठा’वर केला स्टेज फाडू परफॉर्मन्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

Video : नर्सचा जबरदस्त डान्स बघून लकवा भरलेला पेशंटही लागला नाचू, व्हिडिओ तुफान व्हायरल

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.