Harsh Goenka On WFH: वर्क फ्रॉम होम विषयी महत्त्वाची पोस्ट! हर्ष गोएंका यांचं मत ऐकून थक्क व्हाल…

आयुष्य पूर्ववत होत चाललंय. असं असून सुद्धा बऱ्याच अशा कंपनी आहेत ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच करायला सांगतायत.

Harsh Goenka On WFH: वर्क फ्रॉम होम विषयी महत्त्वाची पोस्ट! हर्ष गोएंका यांचं मत ऐकून थक्क व्हाल...
Harsh Goenka viral tweetImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 1:50 PM

उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावरील आपल्या प्रेरणादायी पोस्टसाठी ओळखले जातात. हर्ष गोएंका यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ऑफिसमधून काम करण्याचे फायदे सांगितलेत. कोरोनामुळे सर्व ऑफिसला वर्क फ्रॉम होम सारखी पावलं उचलावी लागली. साथीचा रोग असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले गेले. आता ऑफिस पुन्हा सुरू होत आहेत. आयुष्य पूर्ववत होत चाललंय. असं असून सुद्धा बऱ्याच अशा कंपनी आहेत ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच करायला सांगतायत. अनेक कारणं आहेत याची ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिल्या जात आहेत. पण हर्ष गोएंका यांनी मात्र एकच कारण दिलंय ज्यात वर्क फ्रॉम होम का नसावं आणि वर्क फ्रॉम ऑफिस का असावं याबद्दल सांगितलं गेलंय.

या संदर्भात हर्ष गोयंका यांनी ट्विट केलंय. ट्विटमध्ये हर्ष गोयंका यांनी टू-पाई चार्टचा वापर केलाय. एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये आणि घरी दोन्ही ठिकाणी काम आणि इतर गोष्टींवर किती वेळ घालवतो? हे दाखविण्यात आलंय.

पहिल्या पाई चार्टमध्ये घरात असताना कर्मचारी काम काम आणि फक्त कामच करतोय असं दाखविण्यात आलंय. तर दुसऱ्या पाई चार्टमध्ये कर्मचारी कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये वेळ घालवताना दिसतो.

कर्मचारी ऑफिसमध्ये असला की ब्रेक घेणे, इतरांना त्यांच्या कामात मदत करणे आणि ऑफिसमध्ये कॉफी पिणे, ट्राफिकमध्ये बसणे असं सगळं करत असतो.

हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हे एक कारण आहे की, तुम्ही ऑफिसमधून काम करावे.”

या पोस्टला 3,000 हून अधिक लाईक्स आणि शेकडो शेअर्स मिळालेत. घर किंवा ऑफिसमधून काम करण्याच्या खऱ्या फायद्यांविषयी युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.