AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Photos : उद्योगपती हर्ष गोयंकांनी शेअर केले बिस्किटांचे दोन फोटो, पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) सोशल मीडिया(Social Media)त खूप सक्रिय असतात. हर्ष गोएंका जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर काही मजेदार व्हिडिओ (Video) शेअर करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्सही त्यांच्या पोस्टना प्रतिक्रिया द्यायला लागतात.

Viral Photos : उद्योगपती हर्ष गोयंकांनी शेअर केले बिस्किटांचे दोन फोटो, पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू
बिस्किट
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 10:31 AM

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) सोशल मीडिया(Social Media)त खूप सक्रिय असतात. हर्ष गोएंका जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर काही मजेदार व्हिडिओ (Video) शेअर करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्सही मग त्यांच्या पोस्टना प्रतिक्रिया द्यायला लागतात. लोकांना त्यांची प्रत्येक पोस्ट खूप आवडते आणि लोक त्यांची प्रशंसादेखील करतात. गोयंका पुन्हा एकदा त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. ही एक मजेदार पोस्ट असून यूझर्सना प्रचंड आवडलीय. यूझर्सही हे रोजच अनुभवत असतात. एका बिस्टिकावरून ही पोस्ट असून यूझर्सही ती मजेशीर पद्धतीने अनुभवत आहेत आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत आलेला अनुभव शेअर करत आहेत.

बिस्कीट आणि समस्या

हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चहा बिस्किटांचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात एक मॅरी गोल्ड बिस्किट चहासोबत आणि पार्लेजी बिस्कीट चहासोबत. या फोटोंसोबत त्यांनी असं काही लिहिलंय, की ते वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्यांनी लिहिलं, “मी स्वामी हर्षानंदांना विचारलं,” आजकाल तुम्हाला कोणती मोठी समस्या सतावत आहे? स्वामी हर्षानंद यांनी उत्तर दिलं, “हा ‘मॅरी गोल्ड’ आणि ‘पारले-जी’ दोन्ही बिस्किटं खूप त्रासदायक आहेत. एक कपात जात नाही आणि दुसरा कपामधून येत नाही.

लाइक्स आणि कमेंट्स

उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या या पोस्टला दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय शेकडो लोकांनी रिट्विटही केलंय. यासोबतच लोक या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

यूझर्सच्या मजेदार कमेंट्स

एका यूझरनं लिहिलंय, की स्वामी हर्षानंद यांना कॉफीच्या मगमध्ये चहा पिण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे मॅरी गोल्डही त्यात बुडून जाईल आणि चहा प्यायल्यानंतर तुम्ही चमच्यानं पारले-जीचा आनंदही घ्याल. तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, ‘सरजी, यावर एकच उपचार आहे ‘मॅरी गोल्ड’ फोडून खा. अर्ध्यामध्ये, समस्या सोडवा. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं

Video : ओळखा पाहू हत्ती किती? Viral फोटो पाहून गोंधळात पडले यूझर्स

Video : खबरदार, मोबाइलला हात लावला तर! सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक!

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.