Video: भन्नाट कॉमेडी करणाऱ्या राजपाल यादव यांचा भन्नाट डान्स, लग्नातील डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी राजपाल यादवचा एका लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल की, राजपाल यादव खरंच भन्नाट डान्सर आहे.

Video: भन्नाट कॉमेडी करणाऱ्या राजपाल यादव यांचा भन्नाट डान्स, लग्नातील डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
. भन्नाट कॉमेडी करणारे राजपाल यादव इतका भन्नाट डान्सही करु शकतात यावर कुणाचा विश्वास बसत नाही.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 11:36 AM

राजपाल यादव, बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता, ज्याची कॉमेडी टायमिंग भन्नाट आहे आणि जो कुणालाही लोटपोट करु शकतो. मात्र, हाच राजपाल यादव भन्नाट डान्सर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचा पुरावा देणार आहोत. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी राजपाल यादवचा एका लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल की, राजपाल यादव खरंच भन्नाट डान्सर आहे. ( Harsh Goenka shares old dance video of rajpal yadav with heartwarming reaction)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नातील हा प्रसंग आहे, सगळी वऱ्हाडी मंडळी जमली आहे, वऱ्हाड्यांच्या बरोबर मधोमध एक माणूस तुम्हाला दिसत असेल, तुम्ही या माणसाला ओळखलं नसेल, तर तुमच्या माहितीसाठी हे बॉलीवूड अभिनेते राजपाल यादव आहे. त्याचवेळी एक गाणं सुरु होतं, आणि राजपाल यादव थिरकारला लागतात. सुटा-बुटात असलेले राजपाल यादव सगळं भान विसरतात, आणि मनमुराद नाचतात. आपल्या अंगातील कोटही ते काढून फेकतात. आणि त्यानंतर जी धमाल ते करतात, त्यावर अख्खी वऱ्हाडी मंडळी खूश होतात. भन्नाट कॉमेडी करणारे राजपाल यादव इतका भन्नाट डान्सही करु शकतात यावर कुणाचा विश्वास बसत नाही. एवढ्यावरच राजपाल थांबवत नाहीत, तर समोरचा नाचणारा अभिनेता त्यांना उचलून घेतो आणि तरीही ते नाचत राहतात.

पाहा व्हिडीओ:

 

हर्ष गोयंकांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहलं आहे, प्रत्येक लग्नात असेच काका हवे. याआधी डान्सिंग अंकल फेमस झाले होते, त्यांनी गोविंदाच्या गाण्यावर अप्रतीम नृत्य केलं, त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. डान्सिंग अंकल एका रात्रीत स्टार झाले. पण, राजपाल यादव आधीपासूनच स्टार आहे, पण ते अगदी सामान्यांप्रमाणे गणपती डान्स करु शकतात, मनमुराद नाचू शकतात यावर कुणाचा लवकर विश्वास बसणार नाही. राजपाल यांचा हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया अकाऊंटवरुन खूप व्हायरल केला जात आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

हेही पाहा:

Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

Video: “जब कोई बात बिगड जाए” म्हणत विद्यार्थ्याकडून कॉलेजची फी भरण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी, तरुणाच्या गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.