कुत्र्याचं सोंग लई भारी! इंटरनेटची जनता प्रेमात, लाईक पे लाईक
आपण कुत्र्यांचं त्यांच्या बॉसवरील असलेलं हे प्रेम पाहू शकतो. अशीच एक क्लिप हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

कुत्रे आपल्या मालकाच्या जवळ राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. असे बरेच व्हिडीओ आले आहेत ज्यात आपण कुत्र्यांचं त्यांच्या बॉसवरील असलेलं हे प्रेम पाहू शकतो. अशीच एक क्लिप हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – कुत्रे नेहमीच आपल्या मालकांचे अनुसरण करतात. हा व्हिडीओ 9.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलंय आणि शेकडो लाईक्स मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक युझर्सनी यावर आपला फिडबॅकही दिला. काही युझर्सने लिहिले की, हा अतिशय क्यूट सीन आहे.
12 सेकंदाच्या या क्लिपमध्ये एक वयस्कर माणूस कुबड्यांच्या सहाय्याने चालताना आपल्याला दिसत आहे. त्याच्या एका पायाला फ्रॅक्चर झाले आहे, ज्यामुळे तो असा चालत आहे.
पण गंमत म्हणजे त्यांना या स्टाइलमध्ये चालताना पाहून त्यांच्यासोबत चालणारा कुत्राही लंगडत असल्याचं दिसतंय. डॉगीचं हे प्रेम पाहून लोक तिचे चाहते झालेत!
Dogs always follow their master…pic.twitter.com/bK0NbrZ8Vu
— Harsh Goenka (@hvgoenka) October 2, 2022
गेल्या वर्षी या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली होती. हे प्रकरण लंडनमधील असल्याचं समजलं होतं. पायाच्या फ्रॅक्चरमुळे प्लॅस्टर बांधलेले असल्याने तो कुत्रा फक्त त्यांची नक्कल करत होता.