Haryana: म्हैशीने सर्वाधिक दूध देण्याचा राष्ट्रीय विक्रम रचला, लीटर जाणून तुम्हाला धक्का बसेल
रेश्मा जेव्हा पहिल्यांदा आई झाली होती, त्यावेळी तिने 19-20 लीटर दूध लिटर दूध दिलं होतं. दुसऱ्यादा ज्यावेळी रेश्मा नावाची म्हैस आई झाली. त्यावेळी...
हरियाणा – हरियाणा (haryana) राज्यातील एका म्हैशीने (Buffalo) आपल्या नावावर एक राष्ट्रीय रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे त्या म्हैशीची संपुर्ण राज्यात चर्चा आहे. त्या म्हैशीचं मालकाने रेश्मा नाव ठेवलं आहे. विशेष म्हणजे सगळ्यात जास्त दूध देण्याचा रेकॉर्ड (Milk Record) तिच्या नावावर आहे. ती म्हैशीचा प्रकार मुरा असल्याचं म्हटलं जात आहे.
मालकाने दिलेल्या माहितीनुसार म्हैशीचं नाव रेश्मा आहे. त्याचबरोबर म्हैशीचा प्रकार मुरा असल्याचे जाहीर केले आहे. जास्त दूध देत असल्यामुळे म्हैशीचा सत्कार करण्यात आला आहे. ज्यावेळी रेश्मा नावाची म्हैस आई झाली आहे. त्यावेळी दूधात वाढ झाल्याचे मालकाने सांगितले. 33 लिटर दूध देत अससल्यामुळे रेश्माचा राष्ट्रीय लेवलला सत्कार करण्यात आला आहे.
रेश्मा जेव्हा पहिल्यांदा आई झाली होती, त्यावेळी तिने 19-20 लीटर दूध लिटर दूध दिलं होतं. दुसऱ्यादा ज्यावेळी रेश्मा नावाची म्हैस आई झाली. त्यावेळी 30 लीटर दूध द्यायला लागली. त्यानंतर जेव्हा-जेव्हा म्हैस आई झाली. त्यावेळी तिच्या दूधाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी रेश्माचं 33.8 लिटर दूधाची नोंद घेतली आहे.