पक्ष्याला कधी घरटं बनवताना पाहिलंय का? हा सुंदर व्हिडीओ तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल, बघा
तुमच्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील तर हा व्हिडीओ नक्की त्यांना दाखवा. आधी सोशल मीडियाचं इतकं वेड नव्हतं. पण आता सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर होतात.
पक्षी घरटं बनवताना तुम्ही कधी पाहिलंय का? हे एक खूप सुंदर दृश्य असू शकतं नाही का? आपण नेहमी ऐकलेलं असतं पक्षी आपलं घरटं स्वतः बनवतात पण प्रत्यक्षात पाहायला मात्र मिळत नाही. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात पक्षी घरटं बनवतोय. हे इतकं सुंदर दृश्य आहे. तुमच्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील तर हा व्हिडीओ नक्की त्यांना दाखवा. आधी सोशल मीडियाचं इतकं वेड नव्हतं. पण आता सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर होतात. हा व्हिडीओ सुद्धा इंस्टाग्राम शेअर करण्यात आलाय.
व्हिडीओ
A Sewing Lesson pic.twitter.com/TkVUB9Jwuw
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) September 16, 2022
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पक्षी एका झाडाच्या फांदीवर गवताच्या तुकड्यांनी आपले घरटे बनवत आहे. ती एक-एक करून कपड्यांसारखे घरटं शिवत आहेत.
हे घरटं तो पक्षी इतकं मन लावून तयार करतोय. अतिशय संयमाने हे काम चालू आहे. जेणेकरून त्याचे घर लवकर आणि आरामदायी होईल.
हळू हळू हे घरटं गोल गोल बनत जातं. पक्षी पुन्हा आत जाऊन घरट्याचा आकार सुधारताना दिसतो.
हा व्हिडिओ @Gabriele_Corno ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिलाय.
38 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. याशिवाय लोक कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि निसर्गाची इतर सुंदर दृश्यही शेअर करत आहेत.