प्लास्टिक मध्ये टाकला मासा, मसाले, खाली लावली आग, तरी वितळेना! कसं शक्य?

आम्ही कधी विचार केला आहे का की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही अन्न शिजवले जाऊ शकते? आम्ही विनोद करत आहोत असं तुम्हाला वाटेल, पण आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्लास्टिक मध्ये टाकला मासा, मसाले, खाली लावली आग, तरी वितळेना! कसं शक्य?
Using plastic bag while cookingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:52 PM

स्वादिष्ट अन्न शिजवणे ही एखाद्या कलेपेक्षा कमी नाही. लोकांच्या आत्म्याला तृप्त करणारे स्वादिष्ट अन्न प्रत्येकाला बनवणे शक्य नसते. चांगले अन्न बनवण्यासाठी अनेकदा लोक आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतात हे तुमच्या लक्षात आले असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही अन्न शिजवले जाऊ शकते? आम्ही विनोद करत आहोत असं तुम्हाला वाटेल, पण आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला अशाच स्टाईलमध्ये जेवण बनवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे, कारण साधारणपणे प्लॅस्टिकची पिशवी आगीवर ठेवली तर ती क्षणार्धात वितळते, पण महिलेने प्लॅस्टिकच्या पिशवीत पाणी भरले आहे आणि आगीवर ठेवून अन्नही शिजवत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वृद्ध महिलेने प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरले आणि तिला खाली आग लावली. मग ती पिशवीत विविध प्रकारचे मसाले टाकते आणि त्यात एक मासा शिजवायला ठेवते. मासा शिजला की नाही, हे माहित नाही, पण मासे शिजवण्याची ही पद्धत अतिशय अनोखी आहे आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे आगीच्या संपर्कात आल्यानंतरही प्लॅस्टिकची पिशवी फुटली नाही किंवा किंवा वितळली नाही.

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “An elementary physics…” अवघ्या 59 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘कोणीतरी मला सांगा ही बॅग का वितळत नाही? ” आणखी एका युजरने लिहिलं, “हे कशा प्रकारचं प्लास्टिक आहे?”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.