काहींनी या सापाला सुपरमॅन म्हटलं! उडणारा साप पाहिलात का? VIDEO
तुम्ही कधी सापाला हवेत उडताना पाहिलं आहे का? गंमत वाटते, नाही का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे, ज्यात साप हवेत उडताना दिसत आहे!
तुम्ही कधी सापाला हवेत उडताना पाहिलं आहे का? गंमत वाटते, नाही का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे, ज्यात साप हवेत उडताना दिसत आहे! खरं तर सापाने एका घराच्या छतावरून एवढ्या जोरात उडी मारली की काही क्षण तो हवेत उडत असल्यासारखं वाटलं. मात्र, नंतर गुरुत्वाकर्षण शक्तीने तो जमिनीवर आदळला. तो जमिनीवर पडल्याचा आवाजही ऐकू येतो. पण सापाची उडी पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण अशा प्रकारे साप हवेत उडताना दिसतो हे फारच दुर्मिळ आहे. IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ही क्लिप ट्विटरवर पुन्हा पोस्ट केली आणि लिहिले, “अविश्वसनीय!
हा व्हायरल व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधून सांगितला जात आहे, जो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शेअर केला जात आहे. आयएएसने 31 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या या क्लिपला आतापर्यंत 9 लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
Incredible ? pic.twitter.com/xbHi3w21nU
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) January 31, 2023
युजर्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, चपळता पाहून असे वाटते की अफ्रीकन मांबा आहे. आणखी एकाने लिहिले- सापाची ही प्रजाती आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. तर काही युजर्सनी सापाला सुपरमॅन म्हटलं, तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.