Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संगीत ऐकणारा हत्ती पाहिलात का? हत्ती पाहून नेटकरी म्हणतात…

असं म्हणतात संगीताची भाषा सगळ्यांना समजते, मग तो माणूस असो प्राणी असो किंवा पक्षी. संगीत अशी भाषा आहे की जी सर्वांना अवगत असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

संगीत ऐकणारा हत्ती पाहिलात का? हत्ती पाहून नेटकरी म्हणतात...
संगीत ऐकताना हत्ती
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 10:37 PM

असं म्हणतात संगीताची भाषा सगळ्यांना समजते, मग तो माणूस असो प्राणी असो किंवा पक्षी. संगीत अशी भाषा आहे की जी सर्वांना अवगत असते. संगीताची जादू सर्वांवर चालते. जगात असा एकही मनुष्य नाही की ज्याला म्यूझिक ऐकायला आवडणार नाही. हे झाले माणसांच्या बाबतीमध्ये मात्र अनेकवेळा प्राण्यांना देखील आपण संगीत ऐकताना पाहिले आहे. अनेक प्राणी संगीताच्या तालावर थिरकतात देखील. सोशल मीडियावर प्राण्याचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral videos) होत असतात, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. (elephants viral videos) या व्हिडीओमध्ये एक हत्ती (elephants) संगीत ऐकताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. या पूर्वी देखील असाच एक प्राण्यांचा व्हिडीओ व्हायर झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जंगल परिसरात संगित वाजवत होता, ते संगीत ऐकूण जंगलातील प्राणी त्या व्यक्तीभोवती गोळा झाले होते. आजाचा हा व्हिडीओ देखील तसाच आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये नदीच्या काठावर एक व्यक्ती पियानो वाजवत आहे. या व्यक्तीच्या पाठिमागे एक हत्ती उभा आहे. तो लक्षपूर्वक या पियानोमधून निघणाऱ्या संगीताचे सूर ऐकत आहे. तो हत्ती त्या व्यक्तीच्या पाठिमागे एकदम शांत उभा आहे. हा व्हिडीओ पाहून असा भास होतो की, हा हत्ती संगीतामध्ये हरवून गेला आहे. त्याचे सर्व लक्ष त्या पियानोमधून निघणाऱ्या संगीताच्या धूनकडे आहे. प्राण्यांना मानसांची भाषा कळत नाही, मात्र संगीताची भाषा नक्की कळते हेच या व्हिडीओमधून पहायला मिळत आहे.

55 सेकंदामध्ये 52 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिला व्हिडीओ

@buitengebieden_ नावाच्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीयो शेअर करताना संबंधित युजरने या व्हिडीओला एक कॅप्शन देखील दिले आहे. म्यूझिक ही युनिव्हर्सल भाषा असल्याचे त्याने म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, अवघ्या 55 सेकंदामध्ये 52 हजारांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडीओला पाहिले आहे. तसेच तीन हजारांपेक्षा अधिक लाईक या व्हिडीओला आले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंटस करत आहेत.

  हत्तीचा व्हायरल व्हिडीओ

संबंधित बातम्या

Viral Saree : साडी तर बनवली, पण ती नेसून कुठे फिरणार? ‘हा’ अजब Video पाहून यूझर्स करतायत सवाल

कांदा चिरण्याचे देशी जुगाड पाहिलं का? हसू आवरणार नाही!

Dog rescue : …अन् जळत्या कारमधून बाहेर काढत पोलिसानं कुत्र्याचा ‘अशा’प्रकारे वाचवला जीव, Video Viral

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.